घरठाणेलसीसाठी 'सेलिब्रिटी' झाली कोविड सेंटरची सुपरवायझर

लसीसाठी ‘सेलिब्रिटी’ झाली कोविड सेंटरची सुपरवायझर

Subscribe

मीरा चोप्रा या सेलिब्रिटीला थेट लस कशी देण्यात आली?, असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधीत एजेन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लसीचा तुठवडा जाणवत आहे. त्यातच जेष्ठ नागरिक आणि तरुणांना लसीपासून मुकावे लागत असताना काही ठिकाणी लसीकरणासाठी वेंटिंग करावे लागत आहे. मात्र मीरा चोप्रा या सेलिब्रिटीला थेट लस कशी देण्यात आली?, असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधीत एजेन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

या एजन्सीच्या माध्यमातून अशी किती खोट्या नेमणूक झाल्या आहेत. याची सखोल चौकशी व्हावी आणि या अभिनेत्रीला खरच सुपरवायझर म्हणून नेमले आहे का? की फक्त लस घेण्यासाठी तिला सुपरवायझर म्हणून नेमले, या गोष्टीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याच एजन्सीच्या माध्यमातून मागच्या काळात ग्लोबल कोबड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा घोटाळा समोर आला होता. त्यांच्यावर कारवाई झाली होती. या नेमणुकीबद्दल मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. एजन्सीच्या माध्यमातून कोणत्या नेमणुका झाल्या आहेत. त्या आयुक्तांनी समोर आणाव्यात. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
– निरंजन डावखरे, भाजप, आमदार

- Advertisement -

एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुठवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळले कठिण झाले असताना, दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने लस घेतल्याचे उघड झाले आहे. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली. या अभिनेत्रीचे कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सेलिब्रिटीला ही लस कोणी दिली? आणि कशी दिली? या संशोधनाचा विषय असला तरी नियमबाह्य लस दिल्याने पालिका प्रशासन अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

ठाण्यात अनेक विद्यार्थ्यां परदेशात जाणार आहेत. त्यांना अजून लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ठाणे महापालिकेला विद्यार्थ्यांची चिंता नसून एका सेलिब्रिटीला लस देण्यात आली. हे निंदनीय आहे. आतापर्यंत ठाण्याच्या लसीकरण केंद्राकर कोणकोणत्या सेलिब्रिटींना नियमबाह्य लस देण्यात आली यांची समिती नेमून चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी.
– मनोहर डुंबरे, भाजप गटनेते, ठामपा  

याबाबत नियम तोडून लस घेतल्यानंतर मीरा चोप्रा यांनी मोठ्या आवडीने लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोसोबत बनवण्यात आलेले खोटे ओळखपत्र देखील पोस्ट करण्यात आले असून विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच नियमबाह्य लस देण्यात येणाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

सेलिब्रेटीला लस दिल्याबाबत माहिती घेऊ .तसेच संबधींत संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याचीही माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
– गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठामपा

हेही वाचा –

कसार्‍याजवळ धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -