घरताज्या घडामोडीAtiq Ahmad murder case : अतिक अहमद हत्याकांडप्रकरणी मोठी कारवाई, ५ पोलीस...

Atiq Ahmad murder case : अतिक अहमद हत्याकांडप्रकरणी मोठी कारवाई, ५ पोलीस कर्मचारी निलंबित

Subscribe

गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची १५ एप्रिल रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या सुरक्षेत त्रुटी झाल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहागंज पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यात शहागंज एसओ अश्वनी कुमार सिंह यांच्याशिवाय दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने काल मंगळवारी दुपारी एसओसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची या हत्याकांडाबाबत चौकशी केली होती. यानंतर एसआयटी अहवालाच्या आधारे सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच हत्याकांडाच्या ठिकाणापासून शाहगंज पोलीस ठाणे १००-१५० मीटर अंतरावर आहे.

- Advertisement -

अतिक अहमद आणि अशरफला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार झाला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला झाला तेव्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

अतिक अहमदचा मुलगा असद याला यूपी एसटीएफने १३ एप्रिल रोजी झाशी येथे एका चकमकीत ठार मारले. त्याच्यासोबत त्याचा साथीदार शूटर गुलाम यालाही ठार करण्यात आले आहे. हे दोघेही दिल्लीत काही दिवस आश्रयाला होते. उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी असद अहमद आणि शूटर गुलाम यांना दिल्लीत असताना एन्काउंटरची भीती होती. यामुळे असद अहमद नेहमी तीन ते चार शस्त्रे सोबत बाळगत होता.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, असद अहमद हा त्याचा शूटर गुलाम याच्यासह काही शस्त्र घेऊन फरार झाला होता. दिल्लीत असताना पोलिसांच्या तावडीतून तो थोडक्यात बचावला होता.

- Advertisement -

कोण होता अतिक अहमद?

गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच, अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.


हेही वाचा : अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचे मोठे वक्तव्य; युपीत आता माफिया…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -