घरताज्या घडामोडीCoronaVirus: आयसोलेशनमध्ये असणाऱ्या आजोबांना चिमुरडीचं भावनिक पत्र

CoronaVirus: आयसोलेशनमध्ये असणाऱ्या आजोबांना चिमुरडीचं भावनिक पत्र

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहेत. त्यामुळे अनेक देशामध्ये या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. घरी राहा सुरक्षित राहा, असा सतत मेसेज सरकारकडून सर्व नागरिकांना दिला जात आहे. अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवलेले आहे. तसंच कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसंच कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टसिंगचा आदेशचे पालन केलं जात आहे. यादरम्यान अनेक चिमुरड्याचे पाल्य किंवा आजी-आजोबांना दूर राहवं लागत आहे. अशाच एका ५ वर्षांच्या चिमुरडीने आपल्या आजोबा भावनिक पत्र लिहिलं आहेत. या चिमुरडचे आजोबा ९३ वर्षांचे असून त्यांना आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले आहे.

या चिमुरडीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरस झालं आहे. एलएमएस नावाच्या ट्विटर वापरकर्त्यांने हे पत्र शेअर केलं आहे. त्याने शेअर करताना लिहिलं की, माझ्या आजोबांचे वय ९३ वर्ष असून सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. अलीकडे त्यांच्या शेजारी असलेल्या ५ वर्षांच्या चिमुरडीने लिहिलं पत्र त्यांना मिळालं आहे. तिने लिहिलेल्या पत्राला त्यांनी देखील पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही हे पत्र नक्की वाचा, तुमच्या चेहऱ्यावर आनंद येईल.

- Advertisement -

चिमुरडीने पत्रात काय लिहिलं आहे?

हॅलो, माझं नाव किराह. मी पाच वर्षांची आहे. मला कोरोना विषाणूमुळे घरी राहावं लागत आहे. तुम्ही ठीक आहात ना? हेच जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. मी इंद्रधनुष्याचे चित्र काढलं आहे कारण तुम्ही एकटे नाही आहात, हे मी तुम्हाला सांगते. जर माझ्या पत्राला तुम्हाला उत्तर देता आलं तर द्या. ९ नंबरमध्ये राहणारी तुमची शेजारी.

- Advertisement -

या पत्राचे उत्तर देताना आजोबांनी लिहिलं की, हॅलो किराह. माझी विचारपुस केल्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. मी पूर्णपणे ठीक आहे. मला देखील तुझ्यासारखं आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. मला खूप बरं वाटलं जेव्हा मला कळलं तू माझी काळजी घेते. माझं नाव रॉन असून मी ९३ वर्षांचा आहे. सद्याची परिस्थिती खूप वाईट आहे. या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकत्र मिळून प्रयत्न करावे लागतील. तू काढलेलं चित्र मला खूप आवडलं असून मी ते घरातील खिडकीवर लावणार आहे. त्यामुळे ते इतरांनाही पाहता येईल. लवकरच तू आयसोलेशनमधून बाहेर पडशील. २४ नंबर मध्ये राहणार रॉन.

आतापर्यंत शेअर केलेल्या पत्रा २३ हजाहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत. नेटकऱ्यांनी या भाविनक पत्रावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: कोविड-१९च्या चाचण्या मोफत करा – सर्वोच्च न्यायालय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -