घरताज्या घडामोडीपाकिस्तानच्या तुरुंगात असलेले ५५७ भारतीय मच्छिमार कोरोनाच्या विळख्यात

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले ५५७ भारतीय मच्छिमार कोरोनाच्या विळख्यात

Subscribe

भारताच्या तब्बल १२०० बोटीही पाकिस्तानच्या ताब्यात

भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या अरबी समुद्रात मासेमारी करताना मच्छिमार किंवा इतर कोणीही सागरी सीमा ओलांडून गेल्यास त्याला संबंधित देशांच्या तटरक्षक दलांकडून बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जाते. १ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानच्या या करारानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी देण्यात आली त्यात भारताचे ५५८ मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. ( 557 Indian fishermen fight corona in Pakistan jailed ) त्यातील ३०० मच्छिमारांच्या शिक्षेचा कालवधी संपला असून भारताने त्यांचे राष्ट्रीत्व सिद्ध करणारी कागदपत्रे देखील सादर केली आहेत. मात्र तरीही देखील पाकिस्तानकडून त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. हे भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेलमध्ये कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना महामारीत तुरुंगात असलेल्या मच्छिमारांचे कुटुंबीय अत्यंत चिंचेत आहेत. पाकिस्तान सरकारने या मच्छिमारांना मानवतेच्या दृष्टीने मुक्त करावे अशी विनंती पोरबंदर मच्छिमारांचे नेते जीवनभाई जुनगी यांनी केली आहे.

पाकिस्तानचे ७४ मच्छिमार हे भारताच्या तुरुंगात आहेत. तर पाकिस्तानचे इतर २७१ नागरिक भारताच्या बंदिवासात आहेत. तसेच मच्छिमारांव्यतिरिक्त भारतीतील इतर ५१ नागरिक ही पाकिस्तानमध्ये बंदिवासात आपले आयुष्य जगत आहेत.  पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या अपुऱ्या सोयींमुळे अनेक मच्छिमांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. मच्छिमारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मिळण्यासाठीही प्रतिक्षा करावी लागते. सागरी सीमा ओलांडून गेल्यास केवळ मच्छिमार नाही तर बोटी देखील ताब्यात घेतल्या जातात. भारताच्या तब्बल १२०० बोटी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. भारतात एक तयार करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येतो. पाकिस्तानात या बोटी तशाच पडून राहिल्याने खराब झाल्या आहेत.

- Advertisement -

या प्रश्नावर २००७ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी मिळून एक समिती तयार केली होती. ही समिती २०१३पर्यंत कार्यरत होती त्यानंतर २०१८मध्ये दोन्ही देशांनी ही समिती पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भारताने आपल्या चार सदस्यांची निवड केली असून पाकिस्तान सरकारने देखील त्यांच्या सदस्यांची निवड करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने ७ मुलांसह २० हून अधिक जणांचा मृत्यू, २१ जखमी

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -