घरदेश-विदेशCoronavirus: वयवर्ष ६० असणाऱ्या वृद्धाने चक्क होडीमध्ये राहून स्वतःला केले क्वारंटाईन

Coronavirus: वयवर्ष ६० असणाऱ्या वृद्धाने चक्क होडीमध्ये राहून स्वतःला केले क्वारंटाईन

Subscribe

हा व्यक्ती गेले चार दिवस आपले जीवन या होडीमध्ये घालवत असून तेथील गावकऱ्यांनी त्याला तसे करण्यास भाग पाडले

पश्चिम बंगालच्या मालदा भागात एका ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला होडीमध्ये रहावे लागत आहे. हा व्यक्ती गेले चार दिवस आपले जीवन या होडीमध्ये घालवत असून तेथील गावकऱ्यांनी त्याला तसे करण्यास भाग पाडले आहे. खरंतर डॉक्टरांनी त्याला १४ दिवस इतरांपासून वेगळे राहण्यास सांगितले होते. त्यानंतर या वृद्धाने चक्क होडीलाच आपले घर समजून त्यात राहणं पसंत केले आहे. हा सर्व प्रकार पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील असून नबादवीप येथे राहणारा निरंजन हलदर असे या वृद्धाचे नाव असून हबीबपुर ब्लॉकच्या दोबापारा भागात हा व्यक्ती होडीमध्ये सध्या राहत आहे.

- Advertisement -
हेही वाचा- धक्कादायक! झाडांवर थाटलं क्वारनटाईन होम

‘कोरोना व्हायरस सुरू झाल्यानंतर मला ताप आला होता. गावकऱ्यांनी मला ताप आल्याने माझ्याच गावात मला प्रवेश देण्यास नकार दिला. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी १४ दिवस स्वतःला होम क्वारंनटाईन करण्यास सांगितल्यावर मी होडीवर राहण्याचा निर्णय घेतला’, असे या निरंजन हलदार वयोवृद्ध व्यक्तीने सांगितले.

असा घडला प्रकार

नुकताच निरंजन हलदार हबीबपूरमध्ये आपल्या एका नातेवाईकांकडे गेला होता. नंतर त्याला शारीरिक थकवा जाणवल्याने तो स्थानिक डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्याला १४ दिवस वेगळे राहण्यास सांगितले. गावकऱ्यांना हे कळाल्यानंतर त्यांनी या वृद्धाला गावात प्रवेश दिला नाही. म्हणून या वयोवृद्ध व्यक्तीला गावकऱ्यांना होडीवर राहण्यास भाग पाडलं. असे असले तरी गावकरी त्याला अन्न आणि इतर वस्तू देत आहोत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनही खबरदारी घेत आहे.


इटली: जादूचं पाणी असणाऱ्या ‘या’ गावात कोरोनाची एण्ट्री झालीच नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -