घरक्राइमभारतात दररोज ७७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक अहवाल

भारतात दररोज ७७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद; NCRBचा धक्कादायक अहवाल

Subscribe

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (National Crime Record Bureau) २०२०मध्ये झालेल्या गुन्हांची आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये भारतात दररोज ८० हत्या झाल्या असून एकूण १९ हजार १९३ लोकांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. तसेच संपूर्ण देशात २०२०मध्ये दिवसापोटी सुमारे ७७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात बलात्काराचे एकूण २८ हजार ४६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद राजस्थान आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झाली आहे.

आकडेवारीनुसार, २०१९च्या तुलनेत हत्येच्या गुन्ह्यात एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९मध्ये दररोज ७९ हत्या होत होत्या आणि एकूण २८ हजार ९१५ हत्या झाल्या होत्या. तर अपहरणांची प्रकरणे २०१९ च्या तुलनेत २०२०मध्ये १९ टक्क्यांनी कमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारे एनसीआरबीच्या आकडेवारी म्हटले आहे की, २०२० मध्ये ८४ हजार ८०५ अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर २०१९ मध्ये ही संख्या १ लाख ५ हजार ३६ असा होता.

- Advertisement -

महाराष्ट्र बलात्काराच्या गुन्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर

दरम्यान गेल्या वर्षी बलाकाराच्या एकूण २८ हजार ४६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१९ मध्ये ३२ हजार ३३, २०१८ मध्ये ३३ हजार ३५६, २०१७ मध्ये ३२ हजार ५५९ आणि २०१६ मध्ये ३८ हजार ९४७ बलात्काराच्या गुन्हांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार झाले. ५ हजार ३२० बलाकाराच्या गुन्ह्यांची नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर असून येथे २ हजार ३३९ बलात्कार झाले आहेत. बलात्काराच्या गुन्हात महाराष्ट्राचा नंबर तिसरा क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात २ हजार ६१ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


हेही वाचा – NCRB Report 2020 : मेट्रो शहरांतील गुन्हेगारीत मुंबईचा देशात दुसरा क्रमांक – NCRB

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -