घरताज्या घडामोडीLive Update: भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात बसले उपोषणाला

Live Update: भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात बसले उपोषणाला

Subscribe

भाजप आमदार संजय कुटे मंत्रालयात उपोषणाला बसले आहेत. पीक विमा मिळत नसल्याने संजय कुटे त्रिमूर्ती येथे शेतकाऱ्यांसोबत उपोषण बसले आहेत.


मुंबई शेअर बाजाराची विक्रमी उसळी घेतली असून निर्देशांक ५९ हजारांपार गेला आहे. फ्रान्सला मागे टाकत भारतीय बाजारात जगात सहाव्या क्रमांकावर आहे. निफ्टीच्या निर्देशांकातही उसळी घेतली आहे. निफ्टी १७ हजार ६०० अंकांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळील कंपनीला आग लागली असून यामधून एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. केमिकल कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सुरेखा पुणेकर १६ कलाकारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधणार आहेत.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ५७० नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी ३३ लाख ४३ हजार ३२५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ४३ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ४२ हजार ९२३ रुग्णांचा उपचार सुरू आहेत.


मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे नौका बुडाली होती. यात ११ जण बुडाल्याचे समोर आले होते. शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज पाच जणांचा मृतदेह सापडला आहे. याघटनेतील एकूण ११ पैकी आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत.


बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज पाटीला प्रकृती स्थित आहे.


ठाण्यात गणेश विसर्जनादरम्यान दोघे जण पॉझिटिव्ह आले आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ठाणे प्रशासनाकडून त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. ३ हजार ७४४ भाविकांपैकी दोघे पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात विसर्जन घाटांवर अँटिजेन चाचणी केंद्र उभारण्यात आले आहेत.


अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भुस्खलन आणि दरड कोसळणे याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे. राज्य सरकारकडून आयआयटीचे प्राध्यापक रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करणार आहे. ही समिती झालेल्या घटनांचा अभ्यास करून राज्य सरकारला सादर करणार आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -