Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढला, जुलैपासून अंमलबजावणी

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढला, जुलैपासून अंमलबजावणी

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक संकटाच्या काळात हा ब्रेक लावण्यात आला होता. पण भत्त्यांमधील वाढ पूर्ववत करण्याचा निर्णय केंद्राच्या कॅबिनेटने आज बुधवारी घेतला. याचा फायदा केंद्राच्या लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जवळपास दीड वर्षानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ही भत्त्यामधील वाढ लागू असेल. सध्याच्या १७ टक्क्यांवरून २८ टक्के इतका भत्ता नव्या घोषणेनुसार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या DA च्या वाढीमुळे केंद्राच्या तिजोरीवर ३४ हजार कोटी रूपयांचा भार पडणार आहे.

केंद्र सरकारने कल्याणकारी अशा योजनांवर पैसे खर्च करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे डीए, डीआर भत्ते गोठवले होते. कोरोनाच्या काळात विविध योजनांवर पैसे खर्च करण्यासाठी हे भत्ते गोठविण्यात आले होते. हे भत्ते सुरू करण्यात येणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंड, टेक होम सॅलरी आणि ग्रॅच्युटीमध्येही वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबतची आज घोषणा केली. ही वाढ जुलै महिन्याच्या पगारात मिळणार आहे. या भत्त्यातील वाढीचा फायदा हा ४८ लाख ३४ हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर ६५ लाख २६ हजार पेंशनर्सना मिळणार आहे. याआधी कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांची संघटना नॅशनल काऊंसिलने १ कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेशनर्सना यंदाच्या सप्टेंबरपासून वाढीव महागाई भत्ता मिळेल असे घोषित केले होते. काऊंसिलने २६ जूनला सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन डीए आणि डीआर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकारने हे गोठवलेले भत्ते सुरू करण्यासाठी तयारी दाखवली.


- Advertisement -

 

- Advertisement -