घरCORONA UPDATEमजुरांनी आता फक्त मरायचे का? युपी, महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये भीषण अपघात

मजुरांनी आता फक्त मरायचे का? युपी, महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये भीषण अपघात

Subscribe

आज पहाटेपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्रा आणि बिहार राज्यात झालेल्या अपघातात १६ मजुरांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊनमुळे कामगार आपल्या घरी चालत निघाले आहेत. अनेक ठिकाणी उपासमारीमुळे, अविरत चालण्यामुळे तर कुठे अपघातात कामगारांच्या मृत्यूच्या बातम्या सतत येत आहेत. महाराष्ट्रात विरार येथे एप्रिल महिन्यात पाच मुजरांना मागून येणाऱ्या गाडीने उडवले होते. त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी अपघातांची मालिकाच सुरु झाली. आज तीन राज्यात विविध अपघातात १६ कामगारांनी आपला जीव गमावला आहे. युपी, महाराष्ट्रानंतर बिहारच्या भागलपूर येथील अपघातात ९ स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला आहे.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नौगछिया या गावात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. दरभंगा येथून बांका येथे मजुरांना घेऊन जाणारी एक बस आणि ट्रकची धडक झाली. समोरासमोर झालेल्या या धडकेत ट्रक रस्त्यावरुन बाजुला जाऊन पडला. हा ट्रक पाईप घेऊन जात होता. बसमधील ९ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये तीन कामगारांचा मृत्यू

सोलापूर येथून झारखंडला चाललेल्या स्थलांतरीत मजुरांच्या बसला यवतमाळ येथील आर्णी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून २२ कामगार जखमी झाल्याचे कळते. ही बस मजुरांना नागपूर रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाणार होती. तेथून हे मजूर रेल्वेने झारखंडला जाणार होते.

- Advertisement -

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला टँकरची धडक | Migrant Worker bus accident in Yavatmal.mp4

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला टँकरची धडक | Migrant Worker bus accident in Yavatmal.mp4

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮೇ 19, 2020

 

उत्तर प्रदेशमध्ये ट्रक उलटला, तीन महिलांचा मृत्यू

दिल्ली येथून स्थलांतरीत मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये परतणारा एक ट्रक पहाटे झाशी-मिर्झापूर येथे दुर्घटनाग्रस्त झाला. या अपघातात ट्रकमधील तीन महिलांचा मृत्यू झाला असून १२ लोक कंभीर जखमी झाले. या ट्रकमध्ये २५ मजूर प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. टायर फुटल्यामुळे हा ट्रक उलटून अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -