घरदेश-विदेशमुलाने आईविरूद्ध रचला घृणास्पद कट; आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल!

मुलाने आईविरूद्ध रचला घृणास्पद कट; आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल!

Subscribe

संपुर्ण संपत्ती आपल्या नावे करण्यासह ती मिळवण्यासाठी एका मुलाने मोबाईलवरून स्वतःच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

आपली कौटुंबिक संपत्ती हस्तगत करण्याच्या उद्देशाने मुलाने स्वत:च्या आईविरूद्ध घृणास्पद कट रचला आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र ही सत्य घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असा आरोप केला जात आहे की, संपुर्ण संपत्ती आपल्या नावे करण्यासह ती मिळवण्यासाठी मुलाने मोबाईलवरून स्वतःच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

असा घडला प्रकार

राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपला मुलगा मला घरच्या संपत्तीसाठी ब्लॅकमेल करत आहे, तसेच वयवर्ष ७५ असलेल्या महिलेने तक्रार दाखल करताना असेही सांगितले की, संपत्तीच्या वादामुळे माझ्या मुलाने अश्लील छायाचित्र काढले आणि ते कुटुंबातील लोकांच्या फोनवर देखील शेअर केले.

- Advertisement -

या महिलेने सांगितले की, एके दिवशी ती घरात पूजा हवन करत होती, तेव्हा मुलाने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली आणि आईला घरात आग लागली असल्याचे सांगितले, या आगीतून बचाव व्हावा यासाठी मुलाने कपडे उतरवण्यास सांगितले. महिलेने स्वतःचा जीव वाचण्यासाठी कपडे उतरवताच आरोपीने काही फोटो काढले.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी ताराचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुरा येथे राहणाऱ्या या वृद्ध महिलेने २ दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की मालमत्तेच्या वादामुळे तिच्या ५० वर्षीय मुलाने त्यांचे नग्न फोटे काढले असून ते कुटुंबाच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले होते. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली पण त्याने ते फोटो मोबाईलवरून डिलीट केले. तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी ते फोटो पुन्हा मिळवले. त्या फोटोच्या आधारे कोर्टाने आरोपी मुलाला तुरूंगात देखील पाठविल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

CoronaVirus: प्रतिबंधित लसीशिवाय ‘हे’ नवं औषध थांबवू शकतो कोरोनाचा फैलाव!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -