घरदेश-विदेश93 oscar award 2021: ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात 'या' कलाकारांनी मारली...

93 oscar award 2021: ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात ‘या’ कलाकारांनी मारली बाजी

Subscribe

दिग्गज कलाकारांना मागे टाकून Anthony Hopkins याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अवॉर्डवर बाजी मारली.

जगभरातील चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा मानला जाणारा ९३ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात जगभरातील विविध कलाविष्कारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा पुरस्कार सोहळ्याच्या रूपरेषेत मोठे बदल करण्यात आले होते. कारण यंदाचा सोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे दरवर्षी प्रमाणे ऑस्कर सोहळा पार पडला. या ऑस्कर सोहळ्यादरम्यान कलाविश्वातील अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यंदाच्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘नोमॅडलँड’ याने बाजी मारली. तर याच चित्रपटाने आणखीन दोन महत्वाच्या पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री Frances McDormand आणि दिग्दर्शक Chloé Zhao’ पुरस्कार देखील ‘नोमॅडलँड’ चित्रपटाने खिशात घातल आहेत.

- Advertisement -

ऑस्कर अवॉर्डमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान ज्येष्ठ हॉलिवूड स्टार Anthony Hopkins याला मिळाला आहे ‘The Father’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. Anthony Hopkins याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने सुखद धक्का बसला आहे. Anthony Hopkins समोर अभिनेता Riz Ahmed हा सुद्धा प्रतिस्पर्धी म्हणून उभा होता. मात्र या दिग्गज कलाकारांना मागे टाकून Anthony Hopkins याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अवॉर्डवर बाजी मारली.

 

- Advertisement -


दरम्यान नेट्फ्लिक्सवरील अनेक चित्रपट, वेबसिरीजने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. तब्बल ३६ नामांकने एकट्या नेटफ्लिक्सकने पटकावली आहेत. यात डेविड फिन्चरच्या ब्लॅक एंड व्हाईट ड्रामाम ‘मैनक’चा समावेश आहे.

९३ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यातील आणखीन काही महत्वाच्या पुरस्काराची यादी पुढील प्रमाणे :

संगीत (Original Song)
“Fight For You” जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा

संगीत (Original Score)
सोल ( ट्रेंट रेंजर, अॅटिकस रॉस, जॉन बतिस्टे)

चित्रपट संकलन
साऊंड ऑफ मेटल (मिकेल नेल्सन)

छायांकन
मँक (एरिक मेसेर्शमिट)

प्रोडक्शन डिझाईन
मँक ( प्रोडक्शन डिझाईन : डोनाल्ड ग्रॅहम बर्ट ; सेट डेकोरेशन : जॅन पास्कल)

सहाय्यक अभिनेत्री
Minari (Yuh-Jung Youn)

व्हिज्युअल इफेक्ट्स
टेनेट (अँड्यू जॅकसन, डेव्हिड ली, अँड्यू लॉकली, स्कॉट फिशर)

माहितीपट (Short Subject)
कोलेट (अँटनी गिआचिनो, अॅलिस डोयार्ड)

अॅनिमेटेड फिचर फिल्म
सोल

लघुपट (Animated)
इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

लघुपट (Live Action)
टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

ध्वनी
साऊंड ऑफ मेटल ( निकोलस बेकर, जेमी बक्श्त, मायकल कोटोलेंक, कार्लोस कोर्तेस, फिलीप ब्लाध)

दिग्दर्शन
नोमॅडलँड (Chloé Zhao)

वेशभूषा
माय रेनीस ब्लॅक बॉटम (अॅन रोथ)

रंगभूषा आणि केशभूषा
माय रेनीस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेज रिवेरा, मिया निल, जेमिका विल्सन)

सहाय्यक अभिनेता
जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा (डॅनियल कलूया)

आंतरराष्ट्रीय चित्रपट
अनदर राऊंड (डेन्मार्क)

लेखन (Adapted Screenplay)
द फादर (ख्रिस्तोफर हँप्टन, फ्लोरेन झेलर)

लेखन (Original Screenplay)
प्रॉमिसिंग यंग वूमन (एमरल्ड फेनेल)


हे हि वाचा –  सलमान खानच्या राधे चित्रपटातील ‘सिटी मार’ गाणे झाले रिलीज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -