Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद

मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद

Related Story

- Advertisement -

राज्यातील मोफत लसीकरणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे प्रत्येक पक्षातील मंत्री, प्रवक्ते माध्यमांसमोर येऊन लसीकरणाबाबत वेगवेगळी माहिती देत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये लसीकरणाबाबत एकमत नसल्याचं दिसून येत आहे. अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी १ मे पासून राज्यात नागरिकांचं मोफत लसीकरण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावरुन काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. महसुल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

राज्य सरकार जागतिक टेंडर काढून कमी किंमतीत जी कंपनी लस देईल त्या कंपनी सोबत करार करुन राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. मात्र, मलिक यांच्या घोषणेवर काँग्रेस नाराज असल्याचं दिसतंय. कारण बाळासाहेब थोरात यांनी मोफत लसीकरणावर प्रतिक्रिया देताना श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नसल्याचं थोरात यांनी म्हटलं. सर्वांना लस मोफत द्यावी असा आग्रह काँग्रेस पक्षाचा आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह केला आहे. मात्र, लसीकरणावरुन श्रेयाची जी लढाई चालली आहे, ती योग्य नाही, असं थोरात म्हणाले. आग्रह धरण आमचं काम आहे, परंतु त्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील लसीकरणाबाबत ट्विट केलं होतं. मात्र, काही वेळातचं त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्र सरकारने सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचं ते ट्विट होतं. मात्र, हे ट्विट डिलीट केल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण दिलं. लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

- Advertisement -