घरटेक-वेककोणताही सीईओ कायद्यापेक्षा मोठा नाही, नियामक मंडळाची एलॉन मस्कला तंबी

कोणताही सीईओ कायद्यापेक्षा मोठा नाही, नियामक मंडळाची एलॉन मस्कला तंबी

Subscribe

ट्विटरमध्ये अराजकता माजलेली असताना ब्लू टीक सबस्क्रिप्शन आणि राखाडी रंगाचा ऑफिशिअल लेबल जारी केले होते. मात्र, मस्कने नंतर ऑफिशिअल लेबल काढून टाकले. अधिकृत लेबलमुळे पे सर्व्हिसमध्ये फरक पडला होता. ही सुविधा फक्त अमेरिकेत आयफोन मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.

वॉशिंग्टन – ट्विटरची मालकी घेतल्यापासून एलॉन मस्क (Twitter Head Elon Musk) यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या सुरक्षा आणि गोपनियतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी फेडरल ट्रेड कमिशनने (Federal Trade Commission- FTA) एलॉन मस्क यांना तंबी दिली आहे. कोणताही सीईओ किंवा कंपनी आदेशापेक्षा मोठी नसते, असं एफटीएने म्हटलं आहे. FTA कडून ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. (Federal trade commission warned to twitter head Elon Musk)

हेही वाचा – नोकरीचा पहिला दिवस आनंदाचा अन् दुसरा दिवस अखेरचा; METAच्या कर्मचाऱ्याची भावनिक पोस्ट

- Advertisement -

एलॉन मस्क यांनी ट्विरची मालकी घेताच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. त्यातीलच एक बदल म्हणजे ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करणे. ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर ट्विटरमधील अनेकांनी राजीनामे दिले आहेत. ट्विटर सध्या आर्थिक डबघाईला आले असल्याने येत्या काळात परिस्थिती सुधारली नाही तर, कंपनीचं दिवाळं निघेल असं एलॉन मस्कने म्हटलंय. त्यामुळे ट्विटरचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ली किसनर यांनी अनेक अधिकाऱ्यांसह राजीनामा दिला. ‘मी ट्विटर सोडण्याचा खूप कठीण निर्णय घेत आहे,’ अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. तसंच, ट्विटरचे हेड ऑफ ट्रस्ट अॅण्ड सेफ्टी योएल रोथ यांनी एलॉन मस्क यांच्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीला विरोध केला होता. यावरून योएल यांनीही राजीनामा दिला.

हेही वाचा – ट्विटरने ऑफिशिअल लेबल काढून टाकले; म्हणे, येत्या काळात अनेक बदल होतील

- Advertisement -

ट्विटरमध्ये अराजकता माजलेली असताना ब्लू टीक सबस्क्रिप्शन आणि राखाडी रंगाचा ऑफिशिअल लेबल जारी केले होते. मात्र, मस्कने नंतर ऑफिशिअल लेबल काढून टाकले. अधिकृत लेबलमुळे पे सर्व्हिसमध्ये फरक पडला होता. ही सुविधा फक्त अमेरिकेत आयफोन मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.

ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर अनेक कलाकार, राजकीय नेते, एनबीए स्टार, लेबरॉन जेम्स आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान टोली ब्लेयर यांची फेक खाती तयार झाली होती. यावरून अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने ट्विटरला इशारा दिला आहे. सुरक्षा आणि गोपनियतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफटीएने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला आहे.

हेही वाचा ‘तो’ निर्णय घेऊन मस्क चुकले, कर्मचाऱ्यांना पुन्हा केला फोन; वाचा नेमके काय घडलं?

एफटीसीचे प्रवक्तांनी सांगितले की, ट्विटरच्या सध्याच्या परिस्थितीवरून आम्ही चिंतेत आहोत. कोणताही सीईओ किंवा कंपनी कायद्यापेक्षा मोठी नसते. त्यांना देशातील नियमांचं आणि आदेशांचं पालन करावंच लागेल. तसंच, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरला लाखो डॉलरचा दंड बसू शकतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -