घरमनोरंजनकार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' 2 डिसेंबर 2022 रोजी होणार प्रदर्शित

कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ 2 डिसेंबर 2022 रोजी होणार प्रदर्शित

Subscribe

कार्तिक आर्यनच्या आगामी रोमँटिक थ्रिलर ‘फ्रेडी’ची घोषणा करण्यात आली. शशांक घोष दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि अलाया एफ अभिनीत हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी केवळ डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. फ्रेडी ही डॉ. फ्रेडी जिनवाला (कार्तिक आर्यन) ची कहाणी आहे. फ्रेडी हा एकलकोंडा असून तो त्याच्या मिनीएचर विमानांसोबत रमतो. त्याचा एकमेव मित्र म्हणजे त्याचे पाळीव कासव ‘हार्डी’. ट्विस्ट आणि वळणांनी भरलेले एक मनोरंजक कथानक, फ्रेडी प्रेक्षकांना त्यांच्या आसनांवर खिळवून ठेवेल.

त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना कार्तिक म्हणतो, “हे पात्र डार्क आहे, आपण नेहमी पाहत असलेल्या पारंपरिक बॉलीवूड हिरोसारखे ते नाही. तुम्ही त्याला रूढार्थाने हिरो म्हणू शकत नाही. फ्रेडीमधील माझ्या पात्राने मला एक वेगळा दृष्टीकोन दिला. मला एक नवी बाजू एक्सप्लोर करण्यास मदत केली आणि प्रत्येक टप्प्यावर एक अभिनेता म्हणून माझ्या क्षमतांना आव्हान देण्यासाठी मला प्रोत्साहीत केले.

- Advertisement -

चित्रपटाचा भाग असल्याबद्दलचा आपला उत्साह शेअर करताना, कार्तिक आर्यन म्हणाला, “हे वेगळे आहे. हे मनोरंजक आहे. हा डार्क थ्रिलर आहे जो मधल्या काही काळापासून गायब झाला होता. फ्रेडी तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातून ओढून सीटच्या काठावर खिळवून ठेवेल. हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतील.


हेही वाचा :

‘सनी’ चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो’ गाणं प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -