घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेसाठी नाशिकच्या तरुणीने सोडले एअर इंडियाच्या नोकरीवर पाणी

भारत जोडो यात्रेसाठी नाशिकच्या तरुणीने सोडले एअर इंडियाच्या नोकरीवर पाणी

Subscribe

नोकरी की भारत जोडो यात्रा या दोघांपैकी एकाची निवड करणे भाग होते. पण नेमकी कशाची निवड करायची? याबाबत आतिषाच्या मनात द्विधा मनस्थिती होती.

काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी (kanyakumari)  मधून सुरुवात झाली. या पदयात्रेमधे 118 भारतयात्री सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पदयात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेमधे नाशिक रोड येथील एका तरुणीने सुद्धा सहभाग घेतला आहे. नाशिकच्या आतिषा पैठणकर या तरुणीने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी तिच्या एअर इंडीआयच्या नोकरीवर पाणी सोडले.

भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) महाराष्ट्रात (maharashtra) चांगला प्रतिसाद मिळात आहे. नाशिकच्या आतिषा पैठणकर (aatisha paithankar) या तरुणीने राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभाग घेतला आहे. आतिषाला तब्बल तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. 7 सप्टेंबरला आतिषाला नोकरीवर रुजू व्हायचे होते. पण त्याच दिवशी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. एकीकडे नोकरी आणि दुरीकडे भारत जोडो यात्रा अशी परिस्थिती असल्याने आतिषा द्विधा मस्थितीत अडकली होती. पण शेवटी आतिषाने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

आतिषा पैठणकर (aatisha paithanakar) मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आतिषाच्या घरी आई-वडील, बहीण आणि तिचा भाऊ असतो, तिचा भाऊ सध्या शिक्षण घेतोय तर मोठी बहीण वर्क फ्रॉम होम करते. आतिषाने इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग केले आहे. आतिषाने एअर इंडियाच्या या नोकरीसाठी तब्बल तीन वर्षे प्रयत्न केले. एअर इंडियामध्ये तिची मुलाखत झाल्यानंतर 7 सप्टेंबरला तिला नोकरीवर रुजू होण्याचे पत्र पाठविले. तर इकडे आतिषाने भारत जोडो यात्रेत भारतयात्री म्हणूनही मुलाखत दिली होती.

- Advertisement -

6 सप्टेंबरला ती कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचली. पण नोकरी की भारत जोडो यात्रा या दोघांपैकी एकाची निवड करणे भाग होते. पण नेमकी कशाची निवड करायची? याबाबत आतिषाच्या मनात द्विधा मनस्थिती होती. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आतिषाच्या आई-वडिलांना हे कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा आतिषाला सामना करावा लागला. पण एका महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेन, असा शब्द तिने आई – वडिलांना दिला. आईवडिलांचा होकार मिळाल्या नंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठत भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. भारत जोडो यात्रेला तरुणांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


हे ही वाचा – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -