Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Accident Kanpur : कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू,...

Accident Kanpur : कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांचा कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत केली जाहीर

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे टॅम्पो आणि बसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रॅवल्स बसने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात तब्बल १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या जखमी रुग्णांवर लाला लाजपत राय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कानपूरचे पोलिस अधिकारी अष्ठभुजा प्रसाद सिंघ यांच्या माहितीनुसार, कानपूरच्या सचेंडी पोलीस स्टेशन अंतर्गत रतन खेडा येथे मंगळवारी कानपूर- इटवा महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या महामार्गावर भरधाव येणाऱ्या एका ट्रॅव्हल बसने टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरादार होती की नियंत्रणाबाहेर गेलेली बस महामार्गाच्या कडेला जाऊन आदळली. यानंतर पलटी होऊन खड्ड्यात पडली. या अपघातात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ अपघातग्रस्ताने उपचारांदरम्यान आपले प्राण सोडले.

- Advertisement -

दुर्घटनाग्रस्त ट्रॅव्हल्स बस कानपूर येथून अहमदाबादच्या दिशेने जात होती. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की साचेंदी येथील बिस्किट फॅक्ट्रीत काम करणारे कर्मचारी हे टेम्पोतून प्रवास करत होते. हे सर्वजण फॅक्ट्रीत जात होते. टेम्पोमध्ये बसलेल्या सर्वाधिक प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करत अपघातातील मृतांच्या वारसाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या वारसांना २ लाख रुपये आर्थिक मदत दिली आहे तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत ट्विट केले की, कानपूर येथे झालेला रस्ता अपघात अतिशय दुख:द घटना आहे. या अपघातात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी मृतकांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत मदत कार्य केले. तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. जोरदार झालेल्या या धडकेत बसमधील प्रवासी गाडीच्या आतमध्ये अक्षरश: चेंबले गेल्याने गंभीरित्या जखमी झाले आहेत.


 

 

- Advertisement -