भूकंपामुळे अफगाणिस्तान उद्ध्वस्त; जवळपास ३०० ठार, शेकडो घरं कोसळली

अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यांतील लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांचे हेलिकॉप्टर त्या भागात पोहोचले

afghanistan earthquake kills many people tremors were felt in parts of pakistan

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये जवळपास 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 250 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानमध्येही अनेक भागात विध्वंस झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 40 किमी अंतरावर होता. या भूकंपाचा प्रभाव 500 किमीच्या अंतरापर्यंत जाणवला होता. (afghanistan earthquake kills many people tremors were felt in parts of pakistan)

सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले, दुर्दैवाने, काल रात्री (स्थानिक वेळेनुसार) पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये तीव्र भूकंप झाला. ज्यात आपले शेकडो अफगाणी नागरिक नागरिक मारले गेले आणि जखमी झाले, तर डझनभर घरे उद्ध्वस्त झाली. आम्ही सर्व आपत्कालीन एजन्सींना आवाहन करतो की, पुढील विनाश टाळण्यासाठी या भागात टीम पाठवा. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यांतील लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांचे हेलिकॉप्टर त्या भागात पोहोचले.

अफगाण मीडियानुसार, खोस्तमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंसाची चित्रे समोर आली आहेत. पाकिस्तानमध्येही खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. भूकंपामुळे घराचे छत कोसळले, त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा भूकंप पाकिस्तानी वेळेनुसार पहाटे 1.54 वाजता झाला. पेशावर, इस्लामाबाद, लाहोर आणि पंजाब आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या इतर भागात आणि भारतापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले.

अफगाणिस्तानातील भूकंपामुळे अनेक भाग उद्ध्वस्त झाल्याचे भीषण दृष्ये फोटोतून दिसतायत. युरोपीयन भूकंप केंद्राचा अंदाजानुसार, सुमारे 500 किमी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरले आणि रस्त्यावर आले. दुसरीकडे, पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानात शुक्रवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.


‘मी सरकार बरखास्त म्हटल….’ सरकार बरखास्तीवरील ट्विटवर संजय राऊतांच मोठं विधान