हिंमत असेल श्रद्धाचे शिर शोधून दाखवा; आफताबचे दिल्ली पोलिसांना आव्हान

श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पाेलिसांनी आफताबला अटक केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. पोलिसांनी आफताबला घटनास्थळी नेऊन पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आफताबने दिलेल्या माहितीच्या दिल्ली पोलिसांनी १३ हाडे शोधण्यात यश आले आहे.

14 days judicial custody to accused Aftab in Shraddha Walker murder case

नवी दिल्ली : हिमंत असेल तर श्रद्धाचे शीरसह अन्य अवयव व हत्यार शोधून दाखवा, असे आव्हान संशयित आरोपी आफताब पूनावालाने दिल्ली पोलिसांना केले आहे. आफताबच्या या आव्हानामुळे दिल्ली पोलीसही चक्रावले आहेत.

श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. याप्रकरणी दिल्ली पाेलिसांनी आफताबला अटक केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. पोलिसांनी आफताबला घटनास्थळी नेऊन पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आफताबने दिलेल्या माहितीच्या दिल्ली पोलिसांनी १३ हाडे शोधण्यात यश आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबची पाॅलिग्राफ व नार्को चाचणी केली.  पाॅलिग्राफ चाचणी व नार्को टेस्टमध्ये आफताबने प्रश्नांची उत्तरे देताना गुन्हाची कबुली दिली आहे. पाॅलिग्राफ चाचणीत श्रद्धाची हत्या केल्याची कबुली आफताबने दिली होती. श्रद्धाच्या शरीराचे अवयव जंगलात फेकले. तसेच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे त्याने मान्य केले. श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येचा कट आधीच रचल्याचे व त्याच उद्देशाने श्रद्धाला दिल्लीत आणल्याची कबुली आफताबने पाॅलिग्राफ चाचणीत दिली. श्रद्धाची हत्या केल्याचे घरच्यांना माहिती नव्हते, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

तर नार्को चाचणीत आफताबने श्रद्धाचे कपडे कुठे फेकले व हत्यारे कुठून घेतली याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र उतरांमध्ये तफावत असल्यास त्याच्याकडे याबाबत खुलासा मागितला जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

हत्येची कबुली देणाऱ्या आफताबने आता तर दिल्ली पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. मी हत्येची कबुली दिली आहे. हत्येसाठी हत्यार कुठून आणले हेही सांगितले आहे. हिंमत असेल तर श्रद्धाचे शीरसह अन्य अवयव व हत्यार शोधून दाखवा, असे आव्हान आफताबने पोलिसांना दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे ड्रग्ज कनेक्शन समाेर आले आहे. आफताब ड्रग्ज घ्यायचा. त्याला ड्रग्ज पुरवणारा आरोपी गुजरातमधील आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या हत्याकाडांच्या तपासाठी दिल्ली पोलीस वसईत आले होते. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे नातलग, मित्र-मैत्रिणी यांची चाैकशी केली.