घरदेश-विदेशआरएसएस समर्थक मुखपत्र 'पांचजन्य'मधून इन्फोसिसनंतर आता ‘अ‍ॅमेझॉन’वर जहरी टीका

आरएसएस समर्थक मुखपत्र ‘पांचजन्य’मधून इन्फोसिसनंतर आता ‘अ‍ॅमेझॉन’वर जहरी टीका

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) समर्थक मुखपत्र ‘पांचजन्य’मधून भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची ‘इन्फोसिस’ कंपनीनंतर आता जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’वर जहरी टीका करण्यात आली आहे. ‘पांचजन्य’मधून ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचा ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपाला पाठींबा दर्शवाणाऱ्या या मासिकाने ‘इन्फोसिस’ कंपनीनंतर ‘अ‍ॅमेझॉन’वर टीका करणारा हा दुसरा वादग्रस्त अंक प्रसिद्ध केला आहे. ‘पांचजन्य’च्या यापूर्वीच्या अंकात वस्तू व सेवाकर (GST) आणि प्राप्ती करच्या वेबसाईटवरील तांत्रिक अडचणींवरून ‘इन्फोसिस कंपनी’ एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, असा सवाल उपस्थित केला होता.

‘अ‍ॅमेझॉन’वर टीका करणारे ‘पांचजन्य’चे मुखपृष्ठ

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी ‘पांचजन्य’चे ‘अ‍ॅमेझॉन’वर टीका करणाऱ्या नवीन अंकाचे मुखपृष्ठ शेअर केले आहे. यावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो दिसत होता. या अंकाच्या मथळ्यावर ‘अ‍ॅमेझॉन: ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असा आहे.

- Advertisement -

या मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक यांच्या फोटो छापून कंपनीच्या धोरणांवर जहरी टीका करणारे वाक्य लिहिण्यात आले आहे. ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीने असं काय चुकीचे केलं आहे की त्यांना लाच घ्यावी लागली? का लोक ही कंपनी भारतातील नवउद्योजक, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृतीला धोकादायक असल्याचं मानतायत? असं वाक्य मुखपृष्ठावर लिहिण्यात आलं आहे.

- Advertisement -

भारत सरकारने गेल्या आठवड्यात ‘अ‍ॅमेझॉन’च्या कायदेशीर प्रतिनिधींकडून सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाची ‘भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता’या धोरणावर भर देत चौकशी करणार असे स्पष्ट केले. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’नेही नंतर या लाचखोरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी भारत सरकारचा संबंध असल्याने भ्रष्टाचाराबाबत सरकारचं धोरण शून्य सहनशीलतेचं असून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

‘इन्फोसिस’वर देशद्रोहाची टीका

यापूर्वी ‘पांचजन्य’ने ‘इन्फोसिस’ कंपनीवरही अनेक टीका केली. या कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात आली, ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही आरोप ‘पांचजन्य’तील लेखातून करण्यात आला. जीएसटी आणि प्राप्तीकर वेबसाईटवरील तांत्रिक अडचणींवरून ही टीका करण्यात आली आहे. या दोन्ही वेबसाईट ‘इन्फोसिस’ या भारतातील आघाडीच्या कंपनीने तयार केल्या होत्या. यावेळी ‘पांचजन्य’च्या ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली होती. तर मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. ‘उँची उडान, फिका पकवान,’अशी टीकाही या लेखात करण्यात आली होती.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -