तबलीगींचा किळसवाणा प्रकार : क्वॉरंटाइन सेंटरमध्ये उघड्यावर केला संडास

तबलीगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी उघड्यावर विष्ठा तर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. त्यामुळे दिल्लीतील नरेला येथील क्वॉरंटाइन सेंटरकडून याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

tablighi jamaat markaz case

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमात मरकजमध्ये सामील झालेल्यांचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर तबलीगी जमातच्या काही लोकांना दिल्लीतील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या किळसवाण्या प्रकारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तबलीगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी उघड्यावर विष्ठा तर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. त्यामुळे दिल्लीतील नरेला येथील क्वॉरंटाइन सेंटरकडून याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर दाखल

दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, यामधील दोन जण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काही ऐकत नसल्याचे समोर आले आहे. तसेच ते उघड्यावर विष्ठा टाकत आहेत. दरम्यान, या दोन व्यक्तींमुळे इतर लोकांना देखील त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज त्यांच्याविरोधात क्वॉरंटाइन केलेल्या सेंटेरकडू एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तबलीगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी २१२ नंबरच्या खोली बाहेर काही तबलीगींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच यामध्ये दोघांची नावे देखील नमूद करण्यात आली आहे.


हेही वाचा – Lockdown : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कळवा संपूर्ण लॉकडाऊन!