घरताज्या घडामोडीधक्कादायक! गंभीर गुन्हे असलेले १३ कैदी तुरुंगातून एक साथ फरार

धक्कादायक! गंभीर गुन्हे असलेले १३ कैदी तुरुंगातून एक साथ फरार

Subscribe

कारागृहातून १३ कैदी एकाच वेळी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, या पोलिसांची डोकेदुखी अधिकच वाढल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमध्ये गंभीर आरोप असलेले १३ कैदी तुरुंगातून एक साथ फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे.

नेमके काय घडले?

गुजरातमधील दहोद जिल्ह्यातील देवगढ बरिया तहसीलच्या कारागृहातून १३ कैदी फरार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी या कैद्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी देखील केली आहे. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी साबरमती मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे इतर सर्वच कैद्यांमध्ये कोरोना विषाणूची भीती निर्माण झाली होती. त्यातच आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दाहोदमधील देवगढ आदिवासी जिल्ह्यातील बरिया तहसील कारागृहातून १३ कैदी फरार झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उच्च अधिकाऱ्यांचा ताफा या कारागृहात दाखल झाला आहे. तसेच पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप कैद्यांना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.

संचारबंदीचे उल्लंघन

अहमदाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. एका आरोपींनी कारागृहाचे लॉक तोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता साबरमती कारागृहात दोन कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने या कोरोनाच्या भीतीने आपण पळून जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – जेवण म्हणून दगड उकळवून आई सांत्वन देत राहिली अन्…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -