घरताज्या घडामोडीVIDEO - अहमदाबाद विमानतळावरुन माकडांना पळवण्यासाठी कर्मचारीच बनला 'अस्वल'

VIDEO – अहमदाबाद विमानतळावरुन माकडांना पळवण्यासाठी कर्मचारीच बनला ‘अस्वल’

Subscribe

अहमदाबाद विमानतळावरुन माकडांना पळवण्यासाठी चक्क एका कर्मचाऱ्यालाच अस्वल बनवण्यात आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोकळे मैदान दिसत असून त्या मैदानात अनेक माकडे धावत आहेत. तर त्यांच्या मागे एक अस्वल देखील धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ अहमदाबादच्या विमानतळावरचा असून अहमदाबाद विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृतरीत्या तो व्हिडिओ प्रसारित केला. विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन माकडांना पळवून लावण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

‘अस्वल’ हा अहमदाबाद विमानतळाचा कर्मचारी

विमानतळावर माकडांचा असणारा वावर हा प्रवाशांसह विमानाला देखील धोक्याचा होता. त्यामुळे विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी आपल्या विशाल नावाच्या कर्मचाऱ्याला अस्वलाचा ड्रेस घालून माकडांचा पाठलाग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विशाल यांनी अस्वलाचे कपडे घालून माकडांचा पाठलाग केला आणि माकडांनी देखील अस्वलाला पाहून धूम ठोकली आहे.

माकडे अस्वलाला घाबरतात त्यामुळे आम्ही माकडांना घाबरवण्याकरता अस्वलाचा प्रयोग केला. अस्वलाचा एक ड्रेस मागवून आमच्या कर्मचाऱ्याला परिधान करण्यास सांगत माकडाचा पाठलाग करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आमचा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे दिसून आले आहे.  – मनोज गंगल; डायरेक्टर

- Advertisement -

हेही वाचा – पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, म्हणून ‘या’ व्यक्तीने काय केले बघा?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -