घरताज्या घडामोडीU.S. Raid In Syria : सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या...

U.S. Raid In Syria : सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार, जो बायडनचं मोठं वक्तव्य

Subscribe

अमेरिकेच्या सैन्यांकडून उत्तर-पश्चिम सीरियामध्ये दहशतवादविरोधी मोठी कारवाई करण्यात आली. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठं वक्तव्य केलंय. जो बायडेन यांनी सांगितलं की, उत्तर-पश्चिम भागातील सीरीयामध्ये अमेरिकेच्या विशेष दलांकडून दहशतावादाविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी इस्लामिक स्टेटच्या नेत्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात बायडेन यांनी ट्विट करत म्हटलं की, सशस्त्र दलांच्या कौशल्य आणि कामगिरीसाठी धन्यवाद!, आम्ही ISIS चा नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशीला ठार केलं आहे. आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. तसेच आमचे सर्व अमेरिकन सैनिक या ऑपरेशनमधून सुखरूप मागे परतले आहेत, असं बायडेन यांनी म्हटलंय.

- Advertisement -

अमेरिकेच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, या कारवाईत अल-कुरेशीचा खात्मा करण्यात आला आहे. या घटनेबाबत व्हाईट हाऊसने सांगितलं की, सीरियन ऑपरेशनबद्दलच्या तपशीलाबाबत
बायडेन सकाळी ९ वाजता सविस्तर बोलतील.

- Advertisement -

तुर्कीच्या सीमेजवळील अटमेह भागात असणाऱ्या एका घराला लक्ष्य करून छापेमारी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर संघर्षाला खरी सुरूवात झाली. यामध्ये सहा मुले आणि चार महिलांसह जवळपास १३ जणं ठार झाली, अशी माहिती सीरियाच्या बचावकर्त्यांनी दिली.

यूएस स्पेशल ऑपरेशन फोर्सने आज संध्याकाळी वायव्य सीरीयामध्ये दहशतवादाविरोधी मोठी कारवाई केली आणि मोहीम यशस्वी पार पडली, असं पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात इस्लामिक स्टेटचा संस्थापक अबू बक्र अल-बगदादीच्या हत्येनंतर उत्तराधिकारी म्हणून अल-कुरेशीला ओळखले जायचे.


हेही वाचा : सांबर आणि चितळ्याच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या तरूणाला अटक, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -