घरपालघरतोतया डॉ. हेमंत पाटीलविरोधात भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

तोतया डॉ. हेमंत पाटीलविरोधात भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

Subscribe

वसईतील बोगस डॉ. हेमंत पाटील याने डॉक्टर असल्याची बतावणी करून महापालिकेत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ नोकरी केल्याचे उजेडात आले.

वसईतील बोगस डॉ. हेमंत पाटील याने डॉक्टर असल्याची बतावणी करून महापालिकेत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ नोकरी केल्याचे उजेडात आले असून त्याच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोतया हेमंत पाटील बोगस असल्याचे उजेडात आल्यानंतर त्याच्या विरोधात वसईत गुन्हे दाखल असून सध्या तो तुरुंगात आहे. आता त्याने मिरा भाईंदर महापालिकेलाही फसवल्याचे समोर आले आहे.

कोरोना महामारीत हेमंत पाटील याने खोटी कागदपत्रे दाखवून कंत्राटी डॉक्टर म्हणून काम केले होते. २० एप्रिल २० रोजी त्याची निवड होऊन त्याला भारतरत्नपंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात नियुक्त करण्यात आले होते. पण रुग्णालयातील काम समाधानकारक नसल्याने ९ नोव्हेंबर २० रोजी त्याची सेवा समाप्त करण्यात आली होती. काम करत असताना मागणी करूनही त्याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. वसईत तो बोगस असल्याचे समोर आल्यानंतरमहापालिकेने त्याची तपासणी केली असता त्याने सादर केलेली एमबीबीएसची पदवी बोगस असल्याचे उजेडात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी लांजेकर यांच्या तक्रारीवरून पाटीलविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, हेमंत पाटीलला वसई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने मिरा भाईंदर महापालिकेतही काम केल्याचे उजेडात आले होते. तसेच त्याने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लिल वर्तन केल्याचेही समोर आले होते. एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा –

Dr Suvarna Waje : धक्कादायक! डॉ. सुवर्णा वाजेंचा पतीनेच कट रचून केला घात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -