घरदेश-विदेशकथित 'प्रक्षोभक' भाषणाप्रकरणी अमित शाह अडचणीत; काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार दाखल

कथित ‘प्रक्षोभक’ भाषणाप्रकरणी अमित शाह अडचणीत; काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) दोन आठवडे उरले असताना राज्याची सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. भाजप (BJP)  पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना काँग्रेसने (Congress) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांच्याविरोधात कथित ‘प्रक्षोभक भाषण’ केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत अमित शाह यांच्यावर कर्नाटक राज्यातील निवडणूक रॅलींमध्ये प्रक्षोभक विधान करणे, शत्रुत्व, द्वेषाला प्रोत्साहन देणे आणि विरोधकांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, डॉ. परमेश्वरा आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी आज (27 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

डीके शिवकुमार म्हणाले की, “काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील, असे विधान अमित शाह यांनी केले आहे. त्यांच्याविरोधात आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेस नेत्यांनी तक्रारीत अमित शहा, संबंधित भाजप नेते, कर्नाटकातील विजयपुरा आणि इतर ठिकाणच्या रॅलीच्या आयोजकांची नावांचा उल्लेख केला आहे.

काँग्रेसची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
काँग्रेसने म्हटले आहे की, अमित शहा यांनी भाषणात खोटे आणि निराधार आरोप करताना काँग्रेसची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. जमलेल्या नागरिकांमध्ये विसंवादाचे वातावरण निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या स्पष्ट हेतूने त्यांनी भाषण केले होते. अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या भाषणांच्या क्लिप्स अनेक माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत.

- Advertisement -

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणूका
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीसोबत भाजपा नेत्यांच्या कथित प्रक्षोभक भाषणाची व्हिडिओ लिंकही जोडण्यात आली आहे. तक्रारीत IPC च्या कलम 153, 505(2), 171G आणि 120B चा उल्लेख करण्यात आला आहे. 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे ते एका मागून एक रॅली करत निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -