घरताज्या घडामोडीAmritsar Building Collapse: अमृतसर इमारत दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

Amritsar Building Collapse: अमृतसर इमारत दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

Subscribe

पंजाबच्या अमृतसर येथे इमारतीचा काही भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील पाच मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेमध्ये तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पंजाबच्या अमृतसर येथे इमारतीचा काही भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

एएनआईने दिलेल्या माहितीनुसार; अमृतसर येथील गुरु नानक पुरा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसात इमारतीचा भाग कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेले चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर एका जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही इमारत जुनी आणि जीर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; UGC च्या परीक्षा होणारच


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -