१० दिवसात अतिरिक्त २६०० श्रमिक ट्रेन धावणार; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

ट्रेनमधून देशातील विविध रेल्वे स्थानकातून लाखो मजूर आपापल्या गावी परत जात आहे. मात्र, या ट्रेन अपुऱ्या पडत असल्यामुळे आणि अडकलेल्या मजुरांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त २६०० श्रमिक ट्रेन येत्या १० दिवसात चालविण्याचा महत्वपुर्ण निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरात विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी भारतीय रेल्वेने १ मे पासून श्रमिक ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेनमधून देशातील विविध रेल्वे स्थानकातून लाखो मजूर आपापल्या गावी परत जात आहे. मात्र, या ट्रेन अपुऱ्या पडत असल्यामुळे आणि अडकलेल्या मजुरांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त २६०० श्रमिक ट्रेन येत्या १० दिवसात चालविण्याचा महत्वपुर्ण निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा ३६ लाख मजुरांना होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक २३ मार्चपासून पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन १ मे पासून चालविण्यात येत आहेत. मजुरांची संख्या पाहता आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये, याकरिता पुन्हा रेल्वे मंत्रालयाने श्रमिक ट्रेनची संख्या सुद्धा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० दिवसात २ हजार ६०० श्रमिक ट्रेन देशभरात चालविण्यात येणार आहे. यामुळे ३६ लाख मजुरांना घरी जाता येणार आहे.

श्रमिक ट्रेन ही राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत. एका ट्रेनमधून सुमारे १७०० मजुरांना पाठविण्यात येते. परंतु मजुरांची संख्या अधिक असल्याने श्रमिक ट्रेन वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात २६०० अतिरिक्त श्रमिक ट्रेन चालविण्यात येणार आहे. त्याआधारे ३६ लाख मजुरांना प्रवास करता येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. गेल्या २३ दिवसात रेल्वेने २६०० श्रमिक ट्रेनद्वारे ३६ लाख मजुरांना सुखरुप त्यांच्या मूळ गावी पोहोचविले आहे.