घरदेश-विदेशआंध्रप्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग; सर्व प्रवासी सुखरुप

आंध्रप्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग; सर्व प्रवासी सुखरुप

Subscribe

मध्यप्रदेशमधील ग्वालियर येथे आंध्रप्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. ग्वालियर स्टेशनपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिर्लानगर स्टेशनजवळ ही घटना घडली. आंध्रप्रदेश एक्स्प्रेसच्या दोन वातानुकुलित डब्यांना अचनाक आग लागली. या दुर्घटनेमध्ये कोणतिही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दिल्लीवरुन विशाखापट्टनम येथे जाणाऱ्या आंध्रप्रदेश एक्स्प्रेसला बिर्लानगर स्टेशनजवळ आग लागली. एसी कोच ६ आणि एसी कोच ७ ला अचानक भीषण आग लागली. सकाळी ११.५० वाजता ही घटना घडली.

चालू ट्रेनमध्ये अचानक आग लागल्याने सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ताबडतोब एक्स्प्रेस थांबवण्यात आली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर आग लागलेल्या एसी कोचला बाजूला काढून आग विझवण्यात आली. या आगीमध्ये आंध्रप्रदेश एक्स्प्रेसचे चार डबे जळून खाक झाले. त्याचप्रमाणे या डब्यांमधील प्रवाशांचे सामानही जळून खाक झाले.
एसी कोचमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही लाग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसच्या सहा डब्यांना काढून ते ग्वालियरला पाठवण्यात आले आहे. आग लागलेल्या डब्यातील सर्व प्रवाशांना बसद्वारे ग्वालियर येथे पाठवण्यात आलं. त्याठिकाणावरुन त्यांना बसद्वारे इच्छित स्थानकावर सोडवण्यात येईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे प्रवक्ते वेद प्रकाश यांनी दिली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -