घरदेश-विदेशबीबीसीच्या माहितीपटाला विरोध करणाऱ्या अनिल अँटोनी यांचा काँग्रेसला रामराम

बीबीसीच्या माहितीपटाला विरोध करणाऱ्या अनिल अँटोनी यांचा काँग्रेसला रामराम

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2002च्या गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटाला विरोध दर्शविल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ नावाचा दोन भागांचा माहितीपट युट्यूबवर प्रसारित केल होता. या माहितीपटात 2002मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे हा माहितीपट प्रसारित होताच केंद्र सरकार आणि भाजपाने याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच युट्यूबवर प्रसारित झालेला हा व्हिडीओ हटवण्यात आला असून या युट्यूबच्या लिंक शेअर करण्यात आलेली ट्विटर खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत.

- Advertisement -

काँग्रेससह विरोधकांकडून या माहितीपटाबाबत टीका केली जात असतानाच अनिल अँटोनी यांनी मात्र मंगळवारी ट्विटरवरून बीबीसीच्या विरोधात भूमिका मांडली होती. भाजपासोबत गंभीर मतभेद आहेत. मात्र तरीही, ब्रिटिश ब्रॉडकास्टरच्या अशा विचारांपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. ब्रिटन प्रायोजित या ब्रॉडकास्टरचे तसेच जॅक स्ट्रॉ यांचे भारताबद्दल फार पूर्वीपासून पूर्वग्रह आहेत, असे ट्वीट करत अनिल अँटोनी यांनी बीबीसीच्या त्या माहितीपटाला विरोध केला.

- Advertisement -

याच्या लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. असहिष्णुतेमुळे माझ्यावर एक ट्वीट मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता. विशेष म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे राहणाऱ्यांकडून हा दबाव टाकला जात होता. मी नकार दिला, असे अनिल अँटोनी यांनी सांगितले. प्रेमाचा प्रचार करणारेच फेसबुकवर माझ्याविरुद्ध द्वेषाचा तसेच अपशब्दांचा वापर करत होते. याला दांभिकता म्हणतात. आयुष्य असे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मंगळवारी जे काही घडले ते पाहता, काँग्रेसमधील सर्व जबाबदाऱ्या – केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे (KPCC) डिजिटल मीडिया आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन सेल सोडण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. कृपया हा माझा राजीनामा स्वीकारा, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -