घरताज्या घडामोडीअरुणाचलमधील हिमस्खलनात ७ जवान बेपत्ता, आर्मीसह पोलिसांचे शोधकार्य सुरु

अरुणाचलमधील हिमस्खलनात ७ जवान बेपत्ता, आर्मीसह पोलिसांचे शोधकार्य सुरु

Subscribe

यंदा डारिया हिलमध्ये ३४ वर्षानंतर बर्फवृष्टी झाली आहे. या ठिकाणी १९८८ मध्ये बर्फवृष्टी झाली होती. रविवारी झालेल्या बर्फवृष्टी आणि वादळानंतर भारतीय जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उंचीवर हिमस्खलन केले आहे. हिमस्खलनात भारताचे ७ जवान बेपत्ता झाले आहेत. अरुणाचलमध्ये बर्फवृष्टी झाली असून वेगाने वारे वाहत आहेत. बेपत्ता जवानांचा शोधण्यासाठी आर्मी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. परंतु हा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत आहेत. सैन्याची एक तुकडी गस्तीवर होती. मात्र हिमस्खलन झाल्यानंतर जवानांशी संपर्क झाला नाही असे सांगण्यात येत आहे.

एका निवेदनात लष्कराने म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून या भागात जोरदार हिमवृष्टीसह प्रतिकूल हवामानाची नोंद केली जात आहे. एक विशेष पथकसुद्धा सक्रिय करण्यात आले आहे. जवान एलएसीच्या हाय-अल्टिल्यूड भागात तैनात होते. हिमस्खलानामध्ये सापडल्याने सात जवान बेपत्ता झाले आहेत. हिमस्खलन येण्याच्या तीन ते चार दिवसांपूर्वीपासून बर्फवृष्टी होत असल्यामुळे हवामान खराब झाले होते.

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. चीनने अरुणाचल प्रदेशजवळ नवीन गावे बांधली आहेत. जर युद्ध झाले तर या गावांचा बॅरेकमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. नुकतेच अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात एक तरुण चुकून चीनच्या हद्दीत घुसला होता. सुमारे आठवडाभर चिनी लष्कराच्या ताब्यात राहिल्यानंतर चीनने या तरुणांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तवांग आणि बोमडिला सारख्या उंचीवरील भागात प्रत्येक वर्षी बर्फवृष्टी होते. यंदा डारिया हिलमध्ये ३४ वर्षानंतर बर्फवृष्टी झाली आहे. या ठिकाणी १९८८ मध्ये बर्फवृष्टी झाली होती. रविवारी झालेल्या बर्फवृष्टी आणि वादळानंतर भारतीय जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : गंगेत किती मृतदेह फेकण्यात आले?; यावर मोदी सरकार राज्यसभेत म्हणाले, ‘आमच्याकडे काहीच माहिती नाही’

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -