घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराजूरचा पाणीप्रश्न सुटणार

राजूरचा पाणीप्रश्न सुटणार

Subscribe

पिचड यांच्या पाठपुराव्यातून १० कोटींच्या निधीला मंजुरी

राजूर : अकोले तालुक्यातील राजूर गावासाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 9 कोटी 84 लाख 95 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून राजूरच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड व माजी सरपंच हेमलता पिचड यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे राजूरमध्ये जल्लोष करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत राजूर (ता. अकोले) नळ पाणीपुरवठा योजनेस दि.१ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मौजे राजूर नळ पाणीपुरवठा राजूर येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या ६२९५ रुपये इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ९ कोटी ८४ लक्ष ९५ हजार इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आरखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली आहे.

- Advertisement -

मात्र, त्यासाठी या योजनेचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच हेमलता पिचड यांनी जलजीवन मिशनकडे पाठवून या योजनेस मंजुरी मिळाली म्हणून सर्व राजूर ग्रामस्थांनी माजी आमदार पिचड, माजी सरपंच हेमलता पिचड यांचे आभार मानले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -