घरक्राइमCrime News : ऑनलाईन फसवणुकीचे 35 लाख वाचविण्यात सायबर पोलिसांना यश

Crime News : ऑनलाईन फसवणुकीचे 35 लाख वाचविण्यात सायबर पोलिसांना यश

Subscribe

ऑनलाइन फसवणुकीची सुमारे 35 लाख रुपयांची कॅश वाचविण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे.

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीची सुमारे 35 लाख रुपयांची कॅश वाचविण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. लवकरच ही रक्कम तक्रारदार व्यावासायिकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Cyber police succeeded in saving 35 lakhs from online fraud)

दक्षिण मुंबईत राहणारे तक्रारदार व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ते आयकर आणि पोलीस असल्याचे सांगितले होते. त्यांच्या नावाने एक कुरिअर आले असून त्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून या गुन्ह्यांत त्यांच्या अटकेची भीती दाखविण्यात आली होती. ही कारवाई होऊ नये म्हणून त्यांना एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. अटकेसह बदनामीच्या भीतीने त्यांनी संबंधित बँक खात्यात 35 लाख 12 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.

- Advertisement -

 हेही वाचा – Mumbai Crime News : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा

हा प्रकार त्यांनी त्यांच्या परिचित व्यक्तीला सांगितला. त्याने त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगून सायबर पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन तक्रार करून सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, किरण पाटील यांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी संबंधित खात्यातील व्यवहार थांबवून ती रक्कम फ्रिज केली होती. ही रक्कम लवकरच तक्रारदार व्यावसायिकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

- Advertisement -

आमीर खान डिपफेक व्हिडीओप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मुंबई : सिनेअभिनेता आमीर खान याच्या डिपफेक व्हिडीओप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमीरच्या प्रवक्ताच्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी आमीर खानचा एका खाजगी वाहिनीवर कार्यक्रम दाखविला जात होता. या कार्यक्रमातील काही सीन घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यात फेरफार केले होते. त्यानंतर त्याच्या डिपफेक व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगला व्हायरल होत आहे.

गेल्या वेळेच्या निवडणुकीदरम्यान आमीरने संपूर्ण देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन करून जनजागृती केली होती. मात्र त्याने कुठल्याही पक्षाचा प्रचार केला नव्हता. तरीही त्याच्या डिपफेक व्हिडीओ गैरवापर करून तो एका पक्षाचा प्रचार करत असल्याचे दाखविण्यात आले होते. हा प्रकार अलीकडेच आमीर खानच्या निदर्शनास आला होता. हा व्हिडीओ फेक असल्याचे लक्षात येताच त्याच्यावतीने त्याच्या प्रवक्त्याने खार पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासात सोशल मीडियावर व्हायरल झालेला आमीरचा व्हिडीओ बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा खार पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

हेही वाचा – Shilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -