घरराजकारणगुजरात निवडणूकजसे उडता पंजाब पाहिले, तसे उडता गुजरात झाले; नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल

जसे उडता पंजाब पाहिले, तसे उडता गुजरात झाले; नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

गुजरातमधील खरी परिस्थिती भयावह असून, तेथील तरुणांना व्यसनाधीन करण्याचे पाप भाजपा करत आहे. जसे उडता पंजाब आपण पाहिले तसे उडता गुजरात झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या भाजपाची विक्रमी बहुमताकडे वाटचाल स्पष्ट दिसत आहे.

गुजरातमधील खरी परिस्थिती भयावह असून, तेथील तरुणांना व्यसनाधीन करण्याचे पाप भाजपा करत आहे. जसे उडता पंजाब आपण पाहिले तसे उडता गुजरात झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या भाजपाची विक्रमी बहुमताकडे वाटचाल स्पष्ट दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या निकालाच्या आकडेवारीनुसार भाजपा १५८, काँग्रेस १६, आप ४ आणि अपक्ष चार जागांवर आघाडीवर आहेत. (As we saw the Udta Punjab same like udta Gujarat congress leader Nana Patole talk on BJP victory)

गुजरात निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले बोलत होते. “गुजरातचे निकाल जरी भाजपाच्या बाजूने आज दिसत असले तरी ते लोकशाहीने नव्हे, तर दबावतंत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. गुजरातमध्ये खरी परिस्थिती भयावह आहे. आमच्याकडे जे काही रिपोर्ट आले आहेत ते धक्कादायक आहेत. तिथे तरुणांना व्यसनाधीन आणि ड्रग्जच्या आहारी नेण्याचे पाप भाजपा करत आहेत. जसे उडता पंजाब आपण पाहिले तसे उडता गुजरात झाले आहे. गुजरातच्या जनतेनं कौल दिला आहे. आम्ही आमच्या पराभवाचं आत्मपरिक्षण करू. गुजरातमध्ये भाजपाचं दबावतंत्र चाललं असलं तरी हिमाचलमध्ये दबावतंत्र चाललेलं नाही. काँग्रेसला तिथं चांगलं यश मिळत आहे. तिथं आमचंच सरकार स्थापन होईल”, असे नाना पटोले म्हटले.

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने विक्रमी विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपाने १९८५ मधील काँग्रेसचा १४९ जागा जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.

गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान झाले आहे. या जागांसाठी १६२१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजासह अनेक नेत्यांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. त्यानुसार, निकाल भाजपाच्या बाजूने दिसत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपाचाच बोलबाला, विक्रमी बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस-आपचा सुपडा साफ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -