घरताज्या घडामोडी'कोण आहेत राहुल गांधी' मी त्यांना ओळखत नाही, असदुद्दीन ओवैसींचा काँग्रेसवर घणाघात

‘कोण आहेत राहुल गांधी’ मी त्यांना ओळखत नाही, असदुद्दीन ओवैसींचा काँग्रेसवर घणाघात

Subscribe

देशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि युपीएवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये आता राहुल गांधी कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य ओवैसी केलं आहे. ओवैसींनी काँग्रेसवर टीकास्त्रच डागलं आहे.

एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच पश्चि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली आहे. ओवैसींना राहुल गांधींच्या नेतृत्वार विश्वास नाही का? असा प्रश्न केला. यावर ओवैसी म्हणाले की, कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही परंतु तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा की ते कोण आहेत. अशा शब्दात राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर ओवैसी यांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

आम्हाला सर्व पक्ष बी टीम म्हणतात

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आम्हाला सर्व पक्षांची बी टीम असल्याचे सांगितले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना बोलवले तर ते भाजपसारखे बोलतील आणि अखिलेश यादवसुद्धा तशीच भाषा बोलतील. आता ममता बॅनर्जी यांना बी टीम संबोधले जात आहे. पंरतु यावर माझा आक्षेप आहे कारण बी टीम असणे हा माझा टॅग आहे. आता काँग्रेस त्यांना भाजपची बी टीम असल्याचे बोलत असल्याचे ओवैसी म्हणाले आहेत.

आता लढाईमध्ये अजून वळण येणार आहे. कारण गोवामध्ये ममता बॅनर्जी कशी लढाई करतात. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी ओवैसींना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, एआयएमआयएम सारख्या पक्षांना आणि ओवैसींसारख्या नेत्यांना केरळातून काँग्रेसने उचलले आहे. केरळात काँग्रेसनं मुस्लिम लीगसोबत युती केली. असा पलटवार भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी ओवैसी यांच्यावर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : video viral: पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगनाच्या गाडीला घेराव, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -