घरदेश-विदेशचौकीदार असताना २५० किलो स्फोटके आले कुठून? - ओवेसी

चौकीदार असताना २५० किलो स्फोटके आले कुठून? – ओवेसी

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चौकीदार असताना २५० किलो स्फोटकं कुठून आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत स्वत:ला आपण देशाचे पंतप्रधान नसून चौकीदार आहोत असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न विचारला आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीमध्ये २५० किलो स्फोटकं असल्याची माहिती समोर आली होती. ‘तुम्ही चौकीदार आहात, मग हे स्फोटकं कुठून आले?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘एअर स्ट्राईकचा पुरावा सरकार एनटीआरओचा पुरावा देत आहे की, त्या ठिकाणी ३०० मोबाईल फोन चालू होते. परंतु, सरकारने हे सांगावं की, पुलवामा येथे २५० किलो स्फोटकं आले कुठून?’, असे ओवेसी म्हणाले आहेत.

ओवेसींनी मोदींची उडवली खिल्ली; ‘वाह! क्या चौकीदार है’

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या उमेदवारीचे अर्ज भरले गेले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील उमेदवारीचा अर्ज भरला. दरम्यान, ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेमध्ये ‘मै चौकीदार हूँ’ असे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून वारंवार टीका केली जात आहे. आता असदुद्दीन ओवेसी यांनी एका प्रचारसभेत ‘वाह! क्या चौकीदार है’ असे म्हणत मोदींची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

‘जीएसटीने उद्योगधंद्याची वाट लावली’

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ‘जीएसटीमुळे उद्योगधंद्याची वाट लागली आणि नमो अॅपवर टी-शर्टची विक्री सुरु आहे. वाह! काय चौकीदार आहे. जेट ऐअरवेज डुबून गेली आणि चौकीदार एसबीआयला १५०० कोटी रुपये देत आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली हजारो कारखाने बंद झाले आहेत.’ ‘या लहान कारखान्यांना तुम्ही व्याज नाही देऊ शकत?’, असा प्रश्न त्यांना उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -