घरट्रेंडिंग'हे' आहेत देशातील युनिक मार्केट

‘हे’ आहेत देशातील युनिक मार्केट

Subscribe

भारत देश सुजलाम सुफलाम असल्यामुळे संस्कृतीचे जतन आपण अनेक वर्षानुवर्षे करत आलेले आहोत. आपल्या मूलभूत गरजा या जवळपासच्या मार्केट मधूनच पूर्ण होतात. भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये या मार्केट्सचा मोठा हात आहे.

भारत हा देश अनेक सोयी आणि सुविधांनी सफळ संपूर्ण आहे. भारत देशात काय मिळत नाही;असे काहीच नाही आहे. भारताच्या प्रत्येक राज्याची खास अशी वैशिष्ट्ये असून येथील प्रत्येक राज्यात एक ना अनेक गोष्टी खूप सुप्रसिद्ध आहेत. अशातच आपण आता कोणत्या ठिकाणी काय प्रसिद्ध गोष्टी मिळतात हे बघणार आहोत. तसेच हे सर्व मार्केट्स फार दशकापासून मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळापासून या मार्केट मध्ये अनेक लोकं येथे दैनंदिन वस्तू खरेदी करायला येतात.

भारत देश सुजलाम सुफलाम असल्यामुळे संस्कृतीचे जतन आपण अनेक वर्षानुवर्षे करत आलेले आहोत. आपल्या मूलभूत गरजा या जवळपासच्या मार्केट मधूनच पूर्ण होतात. यासाठी मार्केट असणे हे फार महत्वाचे आहे. प्रत्येक ठिकठिकाणी हव्या त्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध होण्यासाठी प्रसिद्ध अशी बाजारे आहेत. जेणेकरून त्या-त्या गोष्टी पटकन मिळू शकतात. खायचे मार्केट,फळांचे मार्केट,भाजी-पाल्यांचे मार्केट, आणि इतर इतंभूत वस्तू या विशिष्ट्य अशातच ठिकाणी मिळतात.

- Advertisement -

१. पशु बाजार-
भारतातच्या बिहार राज्यात आशियातील सर्वात मोठी गुरांची बाजारपेठ आहे. हे सोनपूर गुरांचा बाजार म्हणून ओळखले जाते. या बाजारात कुत्रे, पर्शियन घोडे, म्हैस, गाढवे, ससे, हत्ती, शेळ्या, पक्षी विकले जातात.

Asia unique market

- Advertisement -

 

२. फ्लोटिंग वेजिटेबल मार्केट-
देशाची शान असलेलं कश्मीर फ्लोटिंग वेजिटेबल मार्केट हे जगभरात खूप प्रसिद्ध आहे. दाल सरोवरावर, फ्लोटिंग व्हेजिटेबल मार्केट हे श्रीनगरमधील एक अनोखे ठिकाण आहे.

 

सुंदर पार्श्‍वभूमीवर उभा असलेला हा रंगीबेरंगी तरंगता बाजार, छायाचित्रकारांचे आश्रयस्थान म्हणून चिन्हांकित करतो. गजबजलेल्या फ्लोटिंग मार्केट पाहण्यासाठी लोकं खूप लांबून येत असतात.

floating market

श्रीनगरच्या नैसर्गिक आर्द्र प्रदेशातील तरंगत्या बागा हे भाजीपाला लागवडीचे मुख्य स्त्रोत आहेत आणि या ताज्या भाज्या नंतर तलावावर तरंगत्या शिकारा बोटींवर विकल्या जातात.

 

३. इमा कीथेल, मणिपुर-
मणिपूर राज्यातील ‘इमा कीथेल’ हे मार्केट विशेष उपयोगी वस्तू खरेदी साठी महत्वाचे आहे. या मार्केट मध्ये सर्व महिला ह्या दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य घटकांचा येथे व्यापार करतात. तसेच महिला या खरेदी मध्ये नेहमीच अग्रेसर असतात.

इमा कीथेल ही मणिपूरमधील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मणिपूरमध्‍ये इमा कीथेल म्हणजे “आईचं मार्केट “.या बाजाराची खासियत म्हणजे इथे तुम्हाला फक्त महिलाच दिसतात. या बाजारात फक्त महिलाच सर्व वस्तू विकतात. या मार्केटमध्ये महिला दुकानदारांची संख्या सुमारे पाच हजार आहे. या मार्केटमध्ये हव्या त्या सर्व काही उपयोगी आणि रोजच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी इथेच मिळतात. परंतू या मार्केटमध्ये जाण्यासाठी मणिपूरची राजधानी इंफाळला जावे लागते आणि तिथून तासाभरच्या अंतरावर हे मार्केट आहे.

 

याप्रकारे,भारत भर असे मोठं मोठे मार्केट्स मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये या मार्केट्सचा मोठा हात आहे.तसेच या मार्केट्स मधून मोठ्याप्रमाणात आयात-निर्यात केली जाते.आणि ह्या मार्केट्स मुळे सहज दैनंदिन वस्तूंची पूर्तता होते. तर या मार्केट्सना नक्की भेट द्या..


हेही वाचा : लाल ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; कियारा अडवाणीचा लूक चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -