घरदेश-विदेशआसाम-मेघालयात कहर; पूरामुळे ७ जिल्ह्यातील २ लाख लोकांना फटका!

आसाम-मेघालयात कहर; पूरामुळे ७ जिल्ह्यातील २ लाख लोकांना फटका!

Subscribe

आसाम-मेघालयातील पुराचा एकूण १ लाख ९४ हजार ९१६ लोकांना फटका

आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत झालेल्या पावसाने अनेक भागात पूर आला आहे. मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे साधारण दोन लाख लोकांना फटका बसला आहे. तसेच मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच पूरजन्य परिस्थिती आहे.

- Advertisement -

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दर्रांग, नलबारी, गोलपारा, डिब्रूगढ़ आणि तिनसुकिया या १७ महसूल क्षेत्रातील २२९ गावे पूरग्रस्त झाली आहेत. एकूण १ लाख ९४ हजार ९१६ लोकांना या पुराचा फटका बसला असून त्यापैकी साधारण ९ हजार लोकांना धेमाजी, लखीमपुर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यात स्थापित केलेल्या ३५ मदत शिबिरात आश्रय देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, या पुरामुळे जवळपास १ हजार ७ हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले असून सुमारे १६ हजार ५०० पाळीव प्राण्यांसह कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्यांनी सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील जिया भराली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे एएसडीएमएने सांगितले आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

आसाम आणि मेघालयात २६ मे ते २८ मे या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील ३ दिवस पावसाची स्थिती गंभीर असेल अशी शक्यता देखील वर्तविली आहे.


भारत-चीन तणाव; मोदींची सेनाप्रमुखांसबोत बैठक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -