घरताज्या घडामोडीAssembly Election Results 2021 LIVE : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

Assembly Election Results 2021 LIVE : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

Subscribe

तृणमूल काँग्रेस – २१६

  • काँग्रेस – ००
  • डावे – ०३
  • भाजप – ७३
  • एकूण – २९२

आसाम

  • भाजप – 79
  • काँग्रेस – 46
  • अन्य – 1
  • एकूण – 126

तामिळनाडू

  • AIDMK – 78
  • अन्य – 1
  • एकूण – 234

केरळ

  • LDF – 87
  • काँग्रेस –  46
  • भाजप – 06
  • इतर – 01
  • एकूण – 140

पुद्दुचेरी

  • NDA -15
  • काँग्रेस – 10
  • इतर – 05
  • एकूण 30

पंढरपूरमध्ये २३ व्या फेरीनंतर भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यातील मतांतर वाढलं

- Advertisement -

भगीरथ भालकेंपेक्षा समाधान आवताडेंना ५ हजार ६२८ अधिक मतं


Assembly Election Results 2021 LIVE : आसाम, पुद्दुचेरीत काय आहे चित्र?

आसाममध्ये सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीच्या काही फेऱ्यांमधून दिसून येत आहे. १२६ जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ८२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४३ जागांवर पुढे आहे. आसाममध्ये बहुमताचा आकडा ६४ आहे.

- Advertisement -

अल्पमतात आल्यानंतर सरकार कोसळेल्या पुद्दुचेरीत पुन्हा काँग्रेस वापसी करणार का याकडेही लक्ष होतं. मात्र, पुद्दुचेरीत भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसने फक्त तीन जागांवर आघाडी घेतली आहे. ३० जागा असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत बहुमतासाठी १६ जागा जिंकणं गरजेचं आहे.

केरळ, तामिळनाडूत कोण?

केरळमध्ये १४० जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत असून विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागा जिंकणं गरजेचं आहे. तर मतमोजणीच्या काही फेऱ्यानंतर एलडीएफ आघाडीवर आहे. एलडीएफने सध्या ८९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर युडीएफ ४६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिनराई विजयन यांची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहे.

तामिळनाडूमध्ये २३४ जागांवरील मतमोजणी होत असून, बहुमतासाठी ११८ जागा जिंकणं आवश्यक आहे. चार तासांच्या मतमोजणीनंतर तामिळनाडूत द्रमुकने सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या द्रमुकने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक ९१ जागांवर आघाडीवर आहे. तर मक्कल नीधी मय्यम पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत. स्वतः कमल हासन यांनी कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आघाडी घेतली आहे.


द्रमकुच्या कार्यालयाबाहेर जल्लोष

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला धोबीपछाड देत द्रमुकने जोरदार मुसंडी मारली आहे. द्रमुक १३९ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीचे कल आल्यानंतर द्रमुक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असून, पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केल्याचं समोर आलं आहे.


केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते पलक्कड मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असून, सुरूवातीच्या काही फेऱ्यानंतर ते आघाडीवर आहेत.


पंढरपुरात सहाव्या फेरीअखेर भगीरथ भालके आघाडीवर आहेत. मात्र, मतांचं अंतर घटलं आहे. सहाव्या फेरीत भगीरथ भालकेंना १७ हजार २१८ मतं मिळाली आहेत. समाधान आवताडे हे १९४ मतांनी पिछाडीवर आहेत.


केरळ : LDF चे एम मणी यांची १३ हजार मतांनी आघाडीवर
LDF ची ९० जागांवर आघाडी, तर युडीएफ ४८ जागा, एनडीए २

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्मदोम येथून ३३५१ मतांनी आघाडीवर


पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे पिछाडीवर आहेत. भगीरथ भालके हे तिसऱ्या फेरीनंतर ६३५ मतांनी आघाडीवर आहेत.


आसाममध्ये सुरूवातीच्या टप्प्यातल्या मतमोजणीत भाजपला कल
NDA ७१ जागांवर आघाडीवर, UPA ला ३९ जागा


केरळमध्ये सर्व जागांचे कल हाती, सुरुवातीच्या कलांमध्ये डाव्यांना बहुमत

केरळमध्ये सर्व जागांचे कल हाती आले असून सुरुवातीच्या कलांमध्ये डाव्यांना बहुमत मिळालं आहे. त्यामुळे केरळमध्ये डाव्यांची सत्ता येऊ शकते.


पश्चिम बंगाल, केरळ, आसाममध्ये मतमोजणी सुरु

केरळमध्ये काँग्रेसची आठ जागांवर आघाडी; पश्चिम बंगालमध्ये भाजप ६, तृणमूल काँग्रेस ११ जागांवर पुढे; आसाममध्ये भाजप ३, काँग्रेस २ जागांवर पुढे


पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी आज होत आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतही कुणाची सत्ता येणार याकडे साऱ्यांच लक्ष आहे. एक्झिट पोलच्या कलानुसार आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरेल, असा अंदाज आहे. केरळमध्ये डावे सत्ता राखतील, तर तमिळनाडूत मात्र सत्तांतराचा अंदाज आहे. त्यामुळे मोजणीच्या प्रत्येक फेरीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -