आम्ही सरकार चालवत नाही सांभाळतोय, कर्नाटकच्या भाजप मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

bjp1

बंगळुरू – कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे बसवराज बोम्मई यांच्या सरकारची अडचण झाली आहे. मधुस्वामी यांनी एका फोन कॉलवर आम्ही सरकार चालवत नाही, आम्ही सांभाळत आहोत, असे म्हटले आहे. दरम्यान मधुस्वामी यांनी ऑडिओ क्लिपमधील वक्तव्य एडिटेड असल्याचे म्हणत सामाजीक कार्यकर्त्यासोबत झालेल्या चर्चेला दुजोरा दिला. मात्र, आपलं वक्तव्य चुकीच्या अर्थानं घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोम्मईंच्या सरकार विरोधात असंतोष वाढत असताना मधुस्वामी यांचे वक्तव्य बाहेर आल्याने भाजप मंत्रिमंडळातू त्यांना हटवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मधुस्वामी आणि चन्नापटना येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाले. भास्कर यांनी वीएसएसएन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या समस्या मधुस्वामी यांना सांगितल्या. यावेळी बोलताना मधुस्वामी यांनी आपण सरकार चालवत नसून सांभाळत आहोत, हे आपल्याला ७ ते ८ महिने सुरु ठेवायचे असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसची टीका –

काँग्रेसने ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बसवराज बोम्मई सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एन ए नारायण यांनी मधुस्वामी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले नसेल.भ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा कट करण्यात आला असेल, असे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये येत्या काही महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहेत.

मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी मधुस्वामींवर केली टीका –

मधुस्वामी यांच्या वक्तव्याने भाजप सरकारपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. बोम्मई सरकारचे दुसरे मंत्री मुनिरत्ना यांनी मधुस्वामी यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी राजीनामा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मधुस्वामी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. मधुस्वामी सरकारचा भाग आहेत, मंत्रिमंडळात ते सहभागी होतात, या प्रकरणी त्यांची देखील जबाबदारी आहे, जबाबदार पदावर राहून ते असे वक्तव्य करु शकत नाहीत असे मुनिरत्ना म्हणाले. सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी देखील मधुस्वामी यांच्यावर टीका केली.