घरमहाराष्ट्रशिंदे सरकारचे 3 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर

शिंदे सरकारचे 3 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर

Subscribe

आज शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेतले.

आज शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात 75 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण देण्याचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास –

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

- Advertisement -
  • महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ –

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन 34 टक्के होणार आहे.

  • दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण –

गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्या येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

  • वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे –वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -