घरदेश-विदेशरिक्षाचालकाने पत्नी आणि मुलींना विकायला काढले

रिक्षाचालकाने पत्नी आणि मुलींना विकायला काढले

Subscribe

एका रिक्षा चालकाने डोक्यावर १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने पत्नी आणि पोटच्या मुलीला विकायला काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आंध्रप्रदेशमधील एका रिक्षाचालकाने डोक्यावर असलेला कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी स्वत:च्या पत्नी आणि मुलींना विकायला काढल्याची घटना घडली आहे. ३८ वर्षाच्या या रिक्षाचालकावर १५ लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने त्याची पत्नी आणि अल्पवयिन मुलीला विकायला काढले. या रिक्षाचालकाला चार मुली आणि एक मुलगा असून सर्व जण अल्पवयिन आहेत. ऐवढेच नाही तर त्याने मुलीच्या विक्रीसाठी बाँडवर स्वाक्षरी देखील केली.

पोटच्या मुलीला दीड लाखात विकले

आंध्रप्रदेशमध्ये रहाणाऱ्या या रिक्षाचालकाने कर्ज काढले होते. या कर्जाचे ओझे वाढतच चालले होते. या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने पत्नी आणि पोटच्या मुलींना विकण्याचा पर्याय शोधून काढला. या रिक्षाचालकाने मुलीला विकण्यासाठी एका महिन्यापूर्वी बाँडवर स्वाक्षरी करत मुलीला देण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्याने त्याच्या १२ वर्षाच्या मुलाला दीड लाखामध्ये विकण्याचा सौदा केला होता.

- Advertisement -

सर्व मुलांना विकण्याची योजना

या रिक्षाचालकाच्या डोक्यामध्ये सुरु असलेल्या योजनेबद्दल त्याच्या पत्नीला काहीच माहिती नव्हते. जेव्हा तिला याबद्दल माहिती पडले तेव्हा तिला धक्का बसला. या रिक्षाचालकाने पत्नीसह सर्व मुलांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. ‘मुलीने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिला खरेदीदारांच्या ताब्यात सोपवण्याचा त्याने करार केला होता. मुलगी वयात येईपर्यंत तिच्यावर कोणाची नजर पडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची अट खरेदीदाराने घातली होती असे आरोपीच्या पत्नीने सांगितले.’

‘ही माझी मुलं असून मी त्यांच्यासोबत काहीही करेल असे माझे पती म्हणाले होते त्यामुळे मी खूप घाबरले होते.’ त्यांनी कर्जापोटी आम्हाला विकायला काढले हे ऐकून मला धक्का बसला.’ – रिक्षाचालकाची पत्नी

पत्नीचा ५ लाखात करणार होता सौदा

रिक्षाचालकाला दारुचे व्यसन होते. तो त्याच्या पत्नीचा देखी सौदा करणार होता. ५ लाखामध्ये तो पत्नीला विकणार होता. त्यासाठी तो पत्नीला बाँडवर स्वाक्षरी करण्याची जबरदस्ती करत होता. नवऱ्याकडून सुरु असलेल्या या कटकारस्थानाला ती घाबरली होती. त्यामुळे सर्व मुलांना घेऊन ती कुर्नूल जिल्ह्यातल्या नानद्याल या आई-वडीलांच्या घरी घेऊन गेली. दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात तिने आई-वडीलांना सांगितले असता त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. रिक्षाचालक पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली.

- Advertisement -

रिक्षाचालकाविरोधात अद्याप गुन्हा दाखल नाही

दरम्यान या मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही महिला मुलांना घेऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी आली. मात्र या महिलेचा नवरा तिच्या आई-वडीलांच्या घरी येऊन तिला आणि तिच्या मुलांना त्रास देत आहे. याप्रकरणात महिलेने जरी पती विरोधत तक्रार दाखल केली असली तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणाचा संपूर्ण तपास करुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करु असे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -