घरदेश-विदेशकायद्याने राममंदिर बांधा; अन्यथा परिस्थिती चिघळेल

कायद्याने राममंदिर बांधा; अन्यथा परिस्थिती चिघळेल

Subscribe

राममंदिराच्या मुद्द्यावरुन वारंवार होत असलेल्या चर्चांमुळे देशाची संस्कृती आणि संस्कार लोप पावत असल्याची खंतही रामदेव बाबांनी व्यक्त केली.

अयोध्येतील राममंदिराचं सध्या जोरदार गाजतंय. २०१९ मधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात राममंदिराच्या प्रकरणाने नवं वादळ उठलं आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते राममंदिराच्या मुद्द्यावरुन एकमेकांवर टीकास्त्र सोडत असताना, आता योगगुरू रामदेव बाबा यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘राममंदिराप्रकणी तडजोड, समझोता करण्याची वेळ निघून गेली आहे. आता कायदा करा आणि अयोध्येत राममंदिर उभारा’ अशा शब्दांत रामदेव बाबांनी याविषयावरील आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच राममंदिर उभारायला उशीर झाला तर भविष्यात देशातील परिस्थीत चिघळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रामदेवबाबा पत्रकारांशी बोलत होते. राममंदिराचा विषय ऐरणीवर येण्यामागे राजकारण आहे का? असा प्रश्न पत्रकरांनी विचारला असता, त्यावर रामदेव बाबांनी ही प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी संवाद साधतेवेळी रामदेवबाबा म्हणाले, की अशाप्रकरच्या वारंवार चर्चांमुळे देशाची संस्कृती आणि संस्कार लोप पावत आहेत आणि या गोष्टीची मला खंत आहे. राममंदिराचा विषय हा देशातील जनतेच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर बोलताना राजकीय नेत्यांनी जपून बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.


वाचा: रामदेव बाबांनी सुरू केले ‘क्लोथ स्टोअर’

देशात एकीकडे मूलभूत अधिकारांवर बोललं जातं आणि दुसरीकडे घटनात्मक आणि नैतिक अधिकारांचीच टिंगल केली जाते, या गोष्टीचा मला खूप संताप येतो असंही रामदेव बाब यावेळी म्हणाले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे पुरस्कर्ते श्री श्री रवीशंकर यांनी राम मंदिराचा मुद्दा तडजोडीने सोडवण्यात यावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, आता चर्चा करण्याची किंवा तडजोड करण्याची वेळ निघून गेली आहे. केवळ संसदेत कायदा करुन राममंदिर निर्माण करणं हा एकच पर्याय आता शिल्लक असल्याचं रामदेव बाब यांनी म्हटलं आहे. देशात या मुद्द्यावरुन सध्या जातीय तणाव नाही पण मंदिर उभारण्यास उशीर झाला तर परिस्थीती चिघळू शकते अशी शक्यताही रामदेवबाबांनी व्यक्त केली. दरम्यान, रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर आता राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात हे तर येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -