घरदेश-विदेशबम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली; पाहा मंत्रमुग्ध करणारे क्षण

बम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली; पाहा मंत्रमुग्ध करणारे क्षण

Subscribe

केदारनाथ मंदिरातील कवाडं सहा महिन्यांच्या शीतकालीन कालावधीनंतर मंगळवारी पहाटे 6:20 वाजता उघडली.

चारधाम यात्रा करणं हे भारतीय संस्कृतीत पवित्र मानलं जातं आहे केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योतिर्लिंगापैकी खूप महत्त्वाचं मानलं जातं. केदारनाथ मंदिरातील कवाडं सहा महिन्यांच्या शीतकालीन कालावधीनंतर मंगळवारी पहाटे 6:20 वाजता उघडली.( Bam Bhole Doors of Kedarnath Temple in Uttarakhand opened Watch the mesmerizing moments )

चारधान यात्रेचं महत्त्व प्रचंड असून, या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढताना दिसत आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेल्या चार धामांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यंदाही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चारधान यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्या सत्रात गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कवाडं खुली करण्यात आली आहेत. केदारनाथ धामची कपाटं 25 एप्रिल 2023,मगंळवारी भाविकांसाठी खुली करण्यात आली.

- Advertisement -

एनआयए वृत्तसंस्थेनकडून मंदिराची कवाडं खुली होतानाच्या क्षणांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. जिथे हे मंत्रमुग्ध करणारे क्षण पाहता येत आहेत. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मंदिराचे मुख्य पुजारी जगदगुरि रावल भीमा शंकर लिंग शिवाचार्य यांनी मंदिराची कवाडं खुली केली. अतिशय सुरेखरित्या सजावट करण्यात आलेल्या या केदारनाथ मंदिराबाहेर आतापासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळत आहेत.

( हेही वाचा: Hyderabad : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने पोलिसांच्या लगावली कानशिलात, जेलमध्ये केली रवानगी )

- Advertisement -

केदारनाथचे दरवाजे सहा महिन्यानंतर उघडणार असल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची मोठ्या प्रमाणात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पहायला मिळत आहे. भक्तीभावाने देशभरातून लोकं केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवाजे उघडण्याचा सोहळा पाहण्यासाठी येथे भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण खराब वातावरणामुळे भक्तांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे भक्तांनी सांभाळून राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार; मग गुळाचा गणपती कोण? ‘सामना’तून सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -