घरताज्या घडामोडीसोनूने 'वॉरीयर आजींना' दिलेला 'हा' शब्द उतरवला सत्यात

सोनूने ‘वॉरीयर आजींना’ दिलेला ‘हा’ शब्द उतरवला सत्यात

Subscribe

लवकरच आजीबाईंच्या हक्काचे व्यासपीठ सुरू होणार आहे.

कोरोनाच्या संकटात गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सोनू सुदने स्थलांतरित मजुरांना मदत करत आहे. त्याने हजारो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. अजूनही त्याचे काम सुरू असून तो आता मजुरांना त्यांच्याच गावात रोजगारही मिळवून देणार आहे. सोनूचा मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान सोनूने गेल्या महिन्यात एक व्हिडिओ शेअर करत वृद्ध आजीबाईंना एक ऑफरच देऊ केली. या आजीबाईंना घेऊन महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणार असल्याचा विचार सोनूने केला होता. आता हाच विचार लवकरच सत्यात उतरत आहे.

एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या आजीबाईंचा व्हिडिओ पाहून सोनूला एक वेगळी चांगली कल्पना सुचली. त्याने ट्विट करून सांगितले की, ‘या आजीबाईंना घेऊन मी महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कूल सुरू करू इच्छित आहे. याकरिता कुणी मला या आजीबाई आणि त्यांच्या संपर्काबद्दल माहिती देता का?’ सोनू सूद आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकत आहे. त्यात, आजीबाईंना दिलेल्या या ऑफरमुळे आणखी भर पडली.

- Advertisement -

या आजीबाईंना रविवारी निर्मिती परिवातील सदस्यांनी भेट दिली. येत्या २२ ऑगस्टला म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी आजीबाईंच्या हक्काच्या व्यासपीठाचा श्री गणेशा होणार आहे. निर्मित फाऊंडेशन हे क्लास सुरू करणार आहे. यामध्ये सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाल्याचे फाऊंडेशने आपल्या ट्विटरद्वारे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शववाहिके अभावी वडिलांचा मृतदेह मुलांनी सायकलवरून नेला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -