घरदेश-विदेशBhopal Fire : भोपाळच्या कमला नेहरु रुग्णालयात भीषण आग, ४ बालकांचा मृत्यू,...

Bhopal Fire : भोपाळच्या कमला नेहरु रुग्णालयात भीषण आग, ४ बालकांचा मृत्यू, ३६ सुरक्षित

Subscribe

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सूचना

भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी रात्री भीषण आगीची दुर्घटना घडली. या घटनेत आत्तापर्यंत चार बालकांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेय. मात्र अनेक मुले यात जखमी झाली आहेत. सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. आग लागत्यानंतर अनेक रूग्णांना रुग्णालयाबाहेर सुरक्षिक काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र रुग्णालयात अडकलेल्या इतर मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पालकांनी एकच धावपळ केली होती.

या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लहान मुलांचा वॉर्ड आहे. याच वॉर्डमध्ये आगीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र प्रचंड प्रमाणात पसरलेल्या धुरामध्ये आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. यासाठी फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दलांच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इर्शाद वलीही घटनास्थळी उपस्थित झाले. याचदरम्यान डॉक्टरांच्या विशेष पथकाला रुग्णालयात पाचारण करण्यात आले.

- Advertisement -

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले की, “कमला नेहरू रुग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये लागलेल्या आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य वेगाने पार पडले असून आग आटोक्यात आली आहे. परंतू दुर्दैवाने गंभीर आजारामुळे दाखल झालेल्या तीन मुलांना वाचवण्यात अपयश आले. अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान हे या घटनेचा तपास करणार आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय आपल्या मुलांच्या शोधात रुग्णालयाबाहेर दिसत होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -