घरदेश-विदेशकेंद्र सरकारकडून 'त्या' 232 मोबाईल अॅप्सविरोधात मोठी कारवाई, चीनसह अन्य देशांना फटका

केंद्र सरकारकडून ‘त्या’ 232 मोबाईल अॅप्सविरोधात मोठी कारवाई, चीनसह अन्य देशांना फटका

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आक्षेपार्ह व्यवहारात गुंतलेल्या 232 मोबाईल अॅप्लिकेशन्सविरोधात मोठी कारवाई केली आहे. हे सर्व अॅप्स बेटिंग, जुगार आणि अनधिकृत कर्जसेवा अशा आक्षेपार्ह व्यवहारात गुंतले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालून ब्लॉक करण्यात आले आहे. यातील 198 बेटिंग तर, 94 कर्जविषयक अॅप्स होते. त्यातील बहुतांश अॅप्स चीनशी संबंधित होते.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेटिंग, जुगार आणि मनी लाँड्रिंगसारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या 138 अॅप्सना ब्लॉक करण्याचे आदेश 4 फेब्रुवारीला संध्याकाळी जारी करण्यात आले होते. मात्र आता अनधिकृत कर्जपुरवठा सेवेत गुंतलेल्या 94 अॅप्सना ब्लॉक करण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. देशाच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे सर्व अॅप्स चीनबरोबरच इतर अनेक देशांतील संस्थामार्फत चालवले जात होते. देशाच्या आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो, हे ध्यानी घेऊनच या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. तथापि, 232 अॅप्स नेमके कोणते आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

चीनसारख्या देशांवर कठोर कारवाई करून भारत सरकार त्यांना प्रत्येक आघाडीवर धक्का देत आहे. गेल्या वर्षी देखील मोदी सरकारने चीनसह विविध देशांनी बनवलेले 348 मोबाइल अॅप ब्लॉक केले होते. हे अॅप्स नागरिकांच्या प्रोफाइलिंगसाठी, वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती अयोग्य पद्धतीने परदेशात पाठवत असल्याचे आढळले होते आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

सन 2020मध्ये चीनबरोबरचा तणाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने त्वरित पावले उचलत सप्टेंबरमध्ये डेटा सुरक्षेच्या कारणास्तव 117 चीनी अॅप्स ब्लॉक केले होते. त्या यादीत टिकटॉक, वुईचॅट मेसेंजर, PUBG यासारख्या लोकप्रिय अॅप देखील समाविष्ट होते. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने कॅमस्कॅनरसारखे लोकप्रिय अॅपही ब्लॉक केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -