घरदेश-विदेशबीआयएसची महाराष्ट्रात छापेमारी, दीड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने केले जप्त

बीआयएसची महाराष्ट्रात छापेमारी, दीड कोटींचे बनावट हॉलमार्क केलेले सोने केले जप्त

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय मानक ब्युरोने (BIS) सोन्याच्या दागिन्यांवरील बीआयएस चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी शुक्रवारी (20 जानेवारी 2023) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विशेष मोहीम राबवली. त्यात सुमारे 1.5 कोटी रुपये किमतीचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त केले.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांतील 6 ठिकाणी भारतीय मानक ब्युरोकडून एकाच वेळी छापे टाकण्यात आले. बीआयएसने निश्चित केल्याप्रमाणे योग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई; मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई; मेसर्स श्रीशंकेश्‍वर ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई; मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे; मे. जोगेश्वरी ॲसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे. रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपन्यांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – ‘अशा’ खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लागतील 700 वर्षं लागतील, न्यायमूर्ती कौल यांनी मांडले वास्तव

- Advertisement -

बीआयएस हॉलमार्किंगचे सध्या तीन भाग आहेत – बीआयएस चिन्ह (Logo), कॅरेटची शुद्धता आणि सूक्ष्मता तसेच 6 अंकी अल्फान्यूमेरिक ‘हॉलमार्किंग युनिक आयडेंटिटी नंबर’ (HUID)” जो प्रत्येक वस्तूसाठी वेगळा आहे. दागिने फक्त बीआयएसमध्ये (BIS) नोंदणीकृत केलेल्या सराफांमार्फत विकले जाऊ शकतात आणि फक्त बीआयएस मान्यताप्राप्त ॲसेइंग आणि हॉलमार्किंग सेंटरद्वारे (AHCs) हॉलमार्क केले जाऊ शकतात.

बनावट हॉलमार्क केलेले दागिने ग्राहकांना मोठ्या नफा घेऊन विकले जातात. म्हणून बीआयएस चिन्ह, कॅरेटमधील शुद्धता आणि सूक्ष्मता तसेच दागिन्यांवर क्रमांकासह (HUID) यासह संपूर्ण BIS हॉलमार्क तपासून घेणे महत्त्वाचे आहे. बीआयएस कायदा 2016नुसार, बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2 लाख रुपये दंडाची शिक्षेची तरतूद आहे. या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -