घरताज्या घडामोडीव्हायरल व्हिडीओ : भरसभेत बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना भाषणास नकार दिला; नेमके...

व्हायरल व्हिडीओ : भरसभेत बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना भाषणास नकार दिला; नेमके प्रकरण काय?

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या महिला नेत्या पंकजा मुंडे या नाराज असून, त्यांना पक्षाकडून डावललं जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या चर्चांना अनेकदा पंकजा मुंडे यांनी पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या महिला नेत्या पंकजा मुंडे या नाराज असून, त्यांना पक्षाकडून डावललं जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या चर्चांना अनेकदा पंकजा मुंडे यांनी पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असे असताना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना पक्षाने डावलल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे यांना मंचावरून बोलू न दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (BJP Chandrashekhar Bawankule Refused Pankaja Munde To Talk On Stage Viral Video Shared By Congress)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिला नेत्या पंकजा मुंडे यांना मंचावरून बोलू दिले नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये “मला दोन मिनिटं बोलू द्या”, असे पंकजा मुंडे म्हणताना दिसत आहेत. त्यावर बावनकुळे ‘नाही’ म्हणत आहेत. या संवादानंतर पंकजा मुंडे आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ट्वीटमध्ये काँग्रेसने काय म्हटले?

“जे स्वतःच्या पक्षातील एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलू देत नसतील, तर ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील. याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!”, असे ट्वीट करत काँग्रेसने भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या व्हायरल व्हिडीओवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट भाजपात आहे. माझ्या कालच्या संपूर्ण दौऱ्यात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो असे मी त्यांना सांगितले, हाच या व्हिडीओमागील आशय आहे”, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

त्याशिवाय, “पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी बीडमध्ये टीम तयार झाली आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच कारवाई करण्यात येणार असून, बदनामी करणारे उघड होतील”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


हेही वाचा – केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात – मी शाळेत गणित, मराठी विषयांत टॉपर होतो…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -