घरदेश-विदेशजामिया मशिदीमध्ये फडकावला आयएसचा झेंडा 

जामिया मशिदीमध्ये फडकावला आयएसचा झेंडा 

Subscribe

तोंडाला काळा कपडा बांधून आलेला एक तरुण थेट मिरवाईजसाठी ठेवलेल्या सिंहासनावर चढला आणि त्याने आयएसचा झेंडा फडकावत देशविरोधी घोषणाबाजी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आयएस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकवल्याची घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील जामिया मशिदीवर काही तरुणांनी आयएसचे झेंडे फडकवाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रात्री जामिया मशिदीमधअये फुटिरतावादी नेता मिरवाईज फारुख याचे भाषण सुरु होते. या भाषणा दरम्यान तोंडाला काळा कपडा बांधून आलेल्या तरुणाने आयएसचा झेंडा फडकावत घोषणाबाजी केली. या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सुरक्षा एजन्सी या तरुणाचा शोध घेत आहे.

- Advertisement -

आयएसचा झेंडा फडकावला

श्रीनगरच्या नौहाटा येथे असणाऱ्या जामिया मशिदीमध्ये ही घटना घडली आहे. या मशिनदीमध्ये शुक्रवारी रात्री फुटिरतावादी नेता मिरवाईज फारुख याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी अनेक फुटिरतावाद्यांनी सभेसाठी मशिदीमध्ये गर्दी केली होती. मिरवाईज याचे भाषण संपले आणि तो त्या ठिकाणावरुन निघताच. तोंडाला काळा कपडा बांधून आलेला एक तरुण थेट मिरवाईजसाठी ठेवलेल्या सिंहासनावर चढला आणि त्याने आयएसचा झेंडा फडकावत देशविरोधी घोषणाबाजी केली. हा संपूर्ण व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशविरोधी घोषणा करणाऱ्याचा शोध सुरु

श्रीनगरमधील नौहाटा परिसर अंत्यत संवेदनशील मानला जातो आणि याच परिसरामध्ये जामिया मशीद आहे. या मशिदीबाहेर दोन वर्षापूर्वी जम्मू-काश्मीरच्या एका पोरिसांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी आयएसचे झेंडे फडकावण्याचा प्रकार घडला असून आता ज्या तरुणाने हा झेंडा फडकावत देशाविरोधी घोषणा केली त्या तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -