घरताज्या घडामोडीकाश्मिरमधील भाजपच्या नेत्याची वडील आणि भावासाहीत दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मिरमधील भाजपच्या नेत्याची वडील आणि भावासाहीत दहशतवाद्यांकडून हत्या

Subscribe

काश्मिरमधील एका तरुण भाजप नेत्याची त्याच्या वडील आणि भावासहीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शेख वसिम बरी असे या नेत्याचे नाव आहे. शेख वसिम बरी हा काश्मिरमधील बंदीपोरा जिल्ह्याचा भाजपचा माजी अध्यक्ष होता. शेख वसिमसोबत त्याचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर याचेही या हल्ल्यात निधन झाले आहे.

जम्मू आणि काश्मिरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले की, आज सायंकाळी ९ वाजता बशिर वसिम बरी आपल्या दुकानात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात वसिमचे वडील आणि भाऊ देखील जखमी झाले होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -